घरमहाराष्ट्र...तर कठोर कारवाई करा; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावरून हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

…तर कठोर कारवाई करा; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावरून हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Subscribe

मुंबईः मिरा-भाईंदर येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात महाराज धीरेंद्र शास्त्री किंवा त्यांच्या समर्थकांकडून काही आक्षेपार्ह कृती घडल्यास पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या कार्यक्रमा विरोधात दीपक दिलीप जगदे यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. न्या. रमेश धानुका व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिले. ही व्हिडीओ रेकॉर्डींग तपासा. या कार्यक्रमात महाराज धीरेंद्र शास्त्री किंवा त्यांच्या समर्थकांकडून काही आक्षेपार्ह विधाने अथवा कृती आढळल्यास कायदेशीररित्या योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने विरोध केला आहे.  एखादी व्यक्ती जादुटोणा विरोधी कायदा २०१३ या कायद्यानुसार बंदी घातलेली कृती करीत असेल तर त्या कृतीला प्रतिबंधित करणे व पोलिसांनी त्यावर स्वतः तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. जादुटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम ५ नुसार दक्षता अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दक्षता अधिकार्‍यास या कायद्यानुसार कारवाई करणे बंधनकारक आहे.

या कायद्यानुसार कलम ३(३) नुसार अप्रत्यक्ष सहाय्य करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा कायदा दखलपात्र व अजामीनपात्र आहे,असे अंनिसचे म्हणणे आहे. शास्त्री यांच्या या व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार जादूटोणा विरोधी कायदा २०१३ (महाराष्ट्र राज्य) नुसार आणि ड्रग्स अँड मजीक रेमीटीज ऍक्ट १९५४ नुसार गुन्हा आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी मीरारोड पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही महाराज धीरेंद्र यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान करत संपूर्ण वारकरी संप्रदयाचाच अपमान केला आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शास्त्रीना कार्यक्रमास परवानगी देण हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले होते. तरीही महाराज धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत झाला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -