घरताज्या घडामोडीनवी मुंबईत गृहस्वप्न पूर्तीची संधी, क्रेडाई-बीएएनएमतर्फे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबईत गृहस्वप्न पूर्तीची संधी, क्रेडाई-बीएएनएमतर्फे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

Subscribe

गेल्या २० वर्षांत लाखो कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रेडाई) यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनातून पूर्ण केले आहे.

यंदाही क्रेडाई-बीएएनएमच्यावतीने २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. सामान्य नागरिकाला परवडणार्‍या घरापासून अत्याधुनिक लक्झरी फ्लॅट प्रदर्शनात उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष वसंत बद्रा यांनी काल (ता.२७) नेरुळमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

यंदाच्या २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनात एकाच छताखाली नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. तर हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. तर या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या भव्य प्रदर्शनाचे डेल्टा ग्रुप मुख्य संयोजक तर पॅराडाईज ग्रुप आणि डीडीएसआर ग्रुप हे मुख्य प्रायोजक, सह-प्रायोजक सुरिदर सभालोक प्रो.कामधेनू रिअ‍ॅलिटीज, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड आणि टेस्कॉन ग्रीन हे नामांकित ग्रुप आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर मागील वर्षी २० वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत झाले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सुमारे १५० बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभागासाठी नोंदणी केली आहे. नवी मुंबई, सिडकोच्या नैना प्रकल्पात तयार झालेल्या त्याच प्रमाणे निर्माणाधीन तसेच भविष्यात निर्माण होणारे प्रकल्पातील घरे बांधकाम व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती हरीश छेडा यांनी दिली. या पत्रकार परिषदेला क्रेडाईचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, धर्मेंद्र कारिया, सुरेंद्रभाई ठक्कर, हरिश छेडा, सचिन अग्रवाल, भूपेन शहा, ए.आर.खत्री, प्रकाश बाविस्कर, जिगर त्रिवेदी, मनिष शाह आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

- Advertisement -

कनेक्टींग नवी मुंबई

मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनातून कनेक्टींग नवी मुंबई आणि विमानतळाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. खारघर, नेरल,खोपोली, कर्जत, रोहिंजग, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच, एनआरआय, सानपाडा आदी ठिकाणी महत्वाकांक्षी गृहप्रकल्प निर्माण करत असलेले शेकडो बिल्डर्स प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
बॉक्स

२० लाख ते १५ कोटींचे घर

नवी मुंबई हे विमानतळ, मेट्रो आणि इतर रस्ते कनेक्टिव्हिटी यांसारख्या अभूतपूर्व पायाभूत सुविधांमुळे राहण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी एक पसंतीचे ठिकाण आहे.सामान्य घर खरेदीदार नजरेसमोर ठेऊन यंदा २१ प्रॉपर्टी प्रदर्शनात २० लाख ते १५ कोटीपर्यंतची( लक्झरी फ्लॅट) घरे उपलब्ध करण्यात आली आहेत.

क्रेडाई बीएएनएम प्रदर्शनात घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना अत्याधुनिक सोयी सुविधा तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सुसज्ज उद्यान, पार्किंग, मार्केट हे बांधकाम उद्योजक जवळच उपलब्ध करून देणार आहेत.नागरिकांना घर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार्‍या विविध वित्तीय कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार असून २१ व्या प्रदर्शनातील गृह सवलतींचा लाभ घेत नागरिकांनी नवी मुंबई विमानतळाच्या कुशीत विसावलेल्या नगरीत आपल्या घरांचे स्वप्न पुर्ण करावे.

– वसंत बद्रा, अध्यक्ष (क्रेडाई-बीएएनएम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -