घरदेश-विदेशपंतप्रधान कर्नाटकमध्ये, जंगलसफारीसाठी नरेंद्र मोदींचा खास लूक; प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण

पंतप्रधान कर्नाटकमध्ये, जंगलसफारीसाठी नरेंद्र मोदींचा खास लूक; प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज कर्नाटक दौऱ्यावर (Karnatak Tour) असून ते बांदीपूर नॅशनल पार्कसह (Bandipur National Park) मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी मोदींनी एक खास लूक (Special Look)केला आहे. या लुकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोदी जंगल सफारीसाठी जाणार असल्यामुळे त्यांनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट, काळे शूज आणि एका हातात स्लीव्हलेस जॅकेट घेऊन चालताना दिसत आहेत.

- Advertisement -

म्हैसूरमधील ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. हे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यामुळे मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आधी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. यावेळी व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं सहायता गटांशी मोदी संवाद साधणार आहेत. याशिवाय मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही मोदी भेट देणार आहेत.

- Advertisement -

प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण
1973 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील बंदीपूर अभयारण्याला भेट देत आहेत. याशिवाय ते व्याघ्र प्रकल्पालाही भेट देणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर कर्नाटकमध्ये येत्या पुढील महिन्यात 10 मे ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये सध्या आचारसंहिता असल्यामुळे पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रम करणार नाही आहेत.

हेही वाचा – शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला; अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -