घरमनोरंजनजेनिफर विंगेट आणि करण ग्रोवरचे 'या' कारणामुळे मोडले लग्न

जेनिफर विंगेट आणि करण ग्रोवरचे ‘या’ कारणामुळे मोडले लग्न

Subscribe

टेलिव्हिन वरील अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि कलाकार करण सिंह ग्रोवर या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. परंतु लग्नाच्या दोन वर्षात असे काय झाले ज्यामुळे त्या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असेल? खरंतर दोघांच्या घटस्फोटाचा निर्णय हा धक्कादाकच होता. कारण २००९ पासूनच हे दोघे इंडस्ट्री मधील सर्वाधिक क्युट कपल म्हणून ओळखले जायचे.

जेनिफर आणि करण या दोघांचे नाते ‘दिल मिल गए’ च्या सेटवरुन सुरु झाले होते. करण तेव्हा विवाहितच होता. त्यावेळी श्रद्धा ही त्याची पत्नी होती. पण शो च्या शुटिंग दरम्याान करणने आपली पहिली बायको श्रद्धा हिला घटस्फोट दिला. याआधी ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये सुद्धा जेनिफर आणि करण या दोघांनी एकत्रित काम केले होते. परंतु त्यावेळी त्यांच्यामध्ये केवळ मैत्री होती. पण दिल मिल गए दरम्यान दोघांची ऑनस्क्रिन आण ऑफस्किन केमिस्ट्रीची चर्चा फार रंगत होती.

- Advertisement -

२०१२ मध्ये ९ एप्रिलला या दोघांनी लग्न केले. श्रद्धा निगम हिला घटस्फोट दिल्यामागील कारण त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे मानले गेले. जेनिफर सोबत लग्न झाले आणि २०१४ मध्ये तिने स्वत:हून सांगितले की, ती करण पासून विभक्त होत आहे. याच दकम्यान करण हा सिनेमांमध्ये एन्ट्री करणार होता.

- Advertisement -

जेनिफर सोबत वेगळे झाल्यानंतर या संपूर्ण प्रकारावर करणने सुरुवातीला मौन धरले होते. परंतु नंतर एकेदिवशी त्याने काही ट्विट्स केले. करणने असे लिहिले होते की, ज्यांना आमच्याबद्दल माहिती आहे त्यांना कळलेच असेल की, आम्ही दोघं आता एकत्रित नाहीत. ही गोष्ट खरी आहे. हा निर्णय त्या दोघांनी मिळून घेतला आहे.

नात्यात फूट पडण्यामागील कारण हे अगदी खासगी आहे. त्यामुळे त्यामागील नक्की कारण काय आहे हे कोणीही जाणुन घेऊ नये. दोघांमध्ये काय झाले, हे केवळ नात्यामधील दोघच समजू शकतात. अन्य बाकी सर्व गोष्टी अफवा, शंका आणि अंदाज आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आभार.

परंतु लग्न मोडण्यामागील कारण हे मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘अलोन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान करण आणि बिपाशा यांच्यामधील मैत्री अधिक वाढत होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये जवळीकता अधिक वाढली. यामुळेच त्याचे आणि जेनिफरचे नाते तुटल्याचे बोलले जात होते.

हे दोघ एकमेकांपासून दूर झाल्यानंतर करणने बिपाशा बासू हिच्याशी लग्न केले. आता या दोघांना एक मुलगी ही झाली आहे. तर करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा त्यांच्या खासगी आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियात पोस्ट करत असतात. तर दुसऱ्या बाजूला जेनिफर सुद्धा तिचे काही फोटोज, व्हिडिओ सोशल मीडियातून पोस्ट करत असते.


हेही वाचा: इलियाना डिस्क्रूजच्या घरी लवकरच पाळणा हलणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -