घरदेश-विदेशKarnataka Election : हनुमानाचा जन्म झाला कर्नाटकात, योगी आदित्यनाथ यांचा दावा

Karnataka Election : हनुमानाचा जन्म झाला कर्नाटकात, योगी आदित्यनाथ यांचा दावा

Subscribe

बंगळुरू : भाजपाचे फायरब्रँड नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election) एंट्री झाली आहे. मांड्या येथील एका रॅलीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा संबंध आजचा नसून त्रेतायुगापासून आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम (Lord Shri Ram) वनवासात असताना त्यांचा सर्वात जवळचा सहकारी असलेला हनुमान (Hanuman) कर्नाटकच्या याच भूमीत जन्माला आल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा त्यांनी राम आणि हनुमानाबद्दल सांगितले. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचे नाते आजचे नाही तर त्रेतायुगापासूनचे आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या वनवासातील सर्वात अभिन्न सहकारी बजरंगबली हनुमान होता आणि त्याचा जन्म कर्नाटकच्या या भूमीवर झाला, असे सांगून ते म्हणाले, जगात जिथे जिथे राम मंदिर असेल तिथे हनुमान मंदिर नक्कीच असते.

उत्तर प्रदेशात नो कर्फ्यू, नो दंगा…
उत्तर प्रदेशात आता ‘नो कर्फ्यू नो दंगा, वहां पर है सब चंगा’, असे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले, आज भारत पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया म्हणून काम करत आहे. टीम इंडियामध्ये किती खेळाडूंचा समावेश करायचा हे कर्नाटकातील जनतेने ठरवायचे आहे. टीम इंडियामध्ये जे खेळाडू जातील. संघ तितक्याच ताकदीने काम करेल. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना भारताला पुढे घेऊन जाईल असा विश्वास आपणा सर्वांना आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

कन्नड भाषेत दिले अयोध्याभेटीचे निमंत्रण
रॅलीतील भाषणाचा समारोप करताना योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकातील जनतेला अयोध्येत येण्याचे निमंत्रण कन्नड भाषेत दिले. मंदिराचे बांधकाम जानेवारी 2024मध्ये पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची मूर्ती ठेवली जाईल. हे 500 वर्षांत पहिल्यांदाच घडणार आहे. प्रभू राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्याच्या शुभमुहूर्तावर मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -