घरपालघरमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पालघरमधील रस्ते होणार मजबूत

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पालघरमधील रस्ते होणार मजबूत

Subscribe

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरूस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली होती.

बोईसर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडून ११४ कोटींचा भरघोष निधी मंजूर झाल्यानंतर आत्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-२ अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यासाठी आणखी ८२ कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून यामुळे नागरीकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण ९०.६७ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील २३ रस्त्यांचा समावेश आहे.या रस्त्यांच्या कामासाठी एकूण ७६.२८ कोटी रुपये आणि पाच वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती म्हणून ५.१९ कोटी रुपये असा एकूण असा जवळपास ८२ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रीया जारी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरूस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली होती.

या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी नागरीक अनेक वर्षे प्रतीक्षा करीत होते.अखेर पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-२ अशा दोन्ही योजना मिळून जवळपास १९६ कोटींचा मोठा निधी पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी खर्च होणार आहे..या कामांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण,लहान-मोठे पूल बांधणे आणि डांबरीकरण यांचा समावेश असून ठेकेदारांना १२ महिन्यात कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

रस्त्यांची नावे
१) पालघर – आगरवाडी ते नगावे,गुंदले करवेळे रस्ता, मथाणे ते एडवण रस्ता, तामसई ते पोचाडे, करवाळे ते कांदरवन
२) वाडा – कादीवली करंजे रस्ता, राज्यमार्ग ३४ ते खरीवली रस्ता, वरसाळे-नवापाडा, सरसओहोळ-आलमान
३) जव्हार – दखन्याचा पाडा ते उंबरपाडा (मानमोहाडी),वडपाडा-भाटेपाडा-मनमोहाडी रस्ता
४) वसई – भिनार ते केळीचा पाडा,जांभूळपाडा ते मडकेपाडाकरजोन ते कोळोशी,आडणे ते हत्तीपाडा
५) डहाणू – वरोती-वांगर्जे-पिंपळशेत बु.,गांगोडी- शेणसरी
६) तलासरी – कुर्झे गावीतपाडा- भुसारापाडा,वडवली डोंगरीपाडा-केळीपाडा
७) मोखाडा – वेहेळपाडा-केगवा, नांदगाव राजेवाडी-भुरीतेक, राजनपाडा, पिंपळपाडा ते इजिमा ४६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -