घरमहाराष्ट्रलोकसभा २०१९ : मोदी सोलापुरात तर, उद्धव ठाकरे बीडमध्ये

लोकसभा २०१९ : मोदी सोलापुरात तर, उद्धव ठाकरे बीडमध्ये

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीड, मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दोघांच्या भाषणांकडे आणि त्यांच्या युतीबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसभा २०१९च्या प्रचाराचं बिगुल वाजायला आता सुरूवात झाली आहे. राज्यातील आजचा दिवस गाजणार तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानं आणि भाषणानं. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीड, मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे हे दुष्काळाचा आढावा घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. लोकसभा निवडणुका आता जवळ आल्यानं दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे. युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेणार? उद्धव ठाकरे भाजपकडे युतीसाठी हात पुढे करणार का? या गोष्टींना आता अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वेळ पडल्यास मित्र पक्षांना देखील पराभवाची धूळ चाळू असं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेनं देखील त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भाषणाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.

वाचा – शिवसेनेसमोर झुकणार नाही – अमित शहा

दुष्काळी भागाचा घेणार आढावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळी भागाचा आढावा घेणार आहेत. आपल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे बीड, जालना आणि मराठवाड्यातील भागाचा आढावा घेणार आहेत. यावेळी बीडमध्ये ३० टन तर जालनामध्ये १० टन चाऱ्याचं वाटप केलं जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांशी देखील उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

मोदींच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेतंर्गत ३०,००० घरांसाठी पायाभरणी केली जाणार आहे. तसेच, सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हायवेच्या कामाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे. ज्यामुळे सोलापूर आणि मराठवाडा प्रवास हा अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहिर सभा देखील घेणार आहेत.

वाचा – भाजप रोडरोमिओसारखं मागे लागलंय – शिवसेना

सोलापुरात निदर्शनं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात निदर्शनं देखील करण्यात आली. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -