घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआज वर्षातील पहिले चंद्रग्रहण; खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्रनुसार महत्वपूर्ण

आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण; खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्रनुसार महत्वपूर्ण

Subscribe

नाशिक : सूर्यग्रहणापाठोपाठ ५ मे रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व असले तरीही ग्रहणाकडे खगोलशास्त्रज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहत असतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पेनम्ब्रल चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्राच्या बाहेरील भागावर पडते. यावेळी चंद्राचा प्रकाश अंधूक होतो. तर, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा चंद्रग्रहण होते असे मानले जाते.

पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्याने पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणावेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवणार नाही. ग्रहणाच्या आधी आणि नंतर चंद्राचे घेतलेले छायाचित्र आणि ग्रहणादरम्यान घेतलेले छायाचित्र यांच्या रंगात आणि तेजस्वितेत बदल झालेला स्पष्टपणे निदर्शनास येतो.

- Advertisement -

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी अर्थात बुद्ध पौर्णिमेला आहे. हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असेल. या दिवशी वैशाख पौर्णिमा असल्याने या चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. कारण आमावस्येच्या दिवशी सूर्य व पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाकला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांत येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण होते.

ग्रहण कालावधीत चंद्र धूरकट दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे ज्योतिष अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये तसेच धार्मिक पथ्ये किंवा अन्य नियम व पथ्ये पाळली नाहीत तरी चालणार आहे.

- Advertisement -
ग्रहणातील दानाचे महत्त्व

चंद्रग्रहणापूर्वी किंवा त्यानंतर केलेले दान अधिक लाभदायक असल्याची धर्मशास्त्रात मान्यता आहे. चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद लाभतात, असे मानले जाते. चंद्रग्रहणात चांदी दान करण्यास प्रचंड महत्त्व आहे. चांदी दान केल्याने मन मजबूत होते आणि बुद्धी कुशाग्र होते, असे म्हटले जाते. म्हणूनच ग्रहणकाळात चांदीची नाणी, मूर्ती आणि भांडी दान केली जातात. चंद्राचा संबंध दूध आणि दह्याशी असल्याने दूध आणि दह्याचे दान केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. मात्र, भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणावेळी असणारे दानाचे नियम पाळले नाही तरी चालणार आहे.

चंद्रग्रहणाची वेळ

५ मे रोजी रात्री ८.४५ वाजता सुरू होईल आणि उत्तररात्री १ वाजता संपणार आहे. चंद्रग्रहणाची परमग्रास वेळ रात्री १०.५३ वाजता आहे. चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी ९ तास आधी सुरू होत असतो. मात्र, वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक कालावधी हा भारतीयांसाठी वैध नसेल.

पहिले चंद्रग्रहण येथे दिसणार

वर्षातील पहिले चंद्रग्रहण म्हणजे पेनम्ब्रल चंद्रग्रहण पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूला असल्याने हे ग्रहण भारताव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणांहून पाहता येईल. वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे यूरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागरात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -