घरदेश-विदेशएक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प?

एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प?

Subscribe

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाजाच्या मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प या अधिवेशनात सादर करणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हेच अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हे लोकसभेचे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यानंतर लोकसभा भंग होणार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या नव्या सदस्यांना देशातील जनता निवडणार आहे. निवडणुकीनंतर नवे सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर करील.

- Advertisement -

यावेळी अंतरिम अर्थसंकल्पाला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कोणते व्हिजन घेऊन मोदी सरकार लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे हे या अर्थसंकल्पावरून स्पष्ट होईल. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला मोठे अपयश आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार लोकप्रिय घोषणा करू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -