घरक्रीडाAsian Wrestling Championships : पुण्याचा कुस्तीपटू भारतीय संघाचे करणार प्रतिनिधित्व

Asian Wrestling Championships : पुण्याचा कुस्तीपटू भारतीय संघाचे करणार प्रतिनिधित्व

Subscribe

पुणे : पुढील महिन्यात बिष्केक किर्गिझस्थान येथे होणाऱ्या 17 आणि 23 वर्षाखालील ग्रीकोरोमन आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवड चाचणीत पुण्यातील कुस्तीपटू सोहम मोरे (Soham More) यांची निवड करण्यात आली असून त्याने 71 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून या गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ग्रीकोरोमन आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ निवड चाचणीचे आयोजन अस्थायी समिती अखिल भारतीय कुस्ती महासंघाने 17 मे रोजी खुल्या पद्धतीने पंजाब येथील पटीयाला येथे केले होते. या चाचणी स्पर्धेत देशभरातील विविध वजन गटातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चारशे खेळाडू सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील अनेक युवा खेळाडूंसह पुण्यातील आयटी जवळील मारुंजी येथील कुस्तीपटू अमोल बुचडे कुस्ती अकादमीतील कुस्तीपटू सोहम मोरे याने 71 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत ग्रीकोरोमन आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.

- Advertisement -

७१ किलो वजन गटात सोहम मोरे याने हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या कुस्तीपटूंचा पराभव करून भारतीय स्तरावरील महाराष्ट्राच्या कुस्तीचा दबदबा कायम राखला आहे. तो कुस्तीगीर रुस्तम-ए-हिंद कुस्तीपटू अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षांपासून सराव करत आहे. त्याने आजवर राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहेत. त्याला अमोल बुचडे यांच्यासह प्रा. किसन बुचडे, प्रशिक्षक नरेंद्र कुमार, पवन गोरे, विनोद गोरे, प्रा. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्रातील हे खेळाडूंचीही निवड
पटीयाला येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत सोहमसह 17 वर्षाखालील 48 किलो वजन गटात कोल्हापूरच्या सिध्दनाथ पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत भारतीय संघात जागा मिळवली आहे. सिध्दनाथ हा भारतीय सेना दलाच्या आर्मी बॉईज इन्स्टिट्यूट पुणे येथे सराव करतो. त्याच्याशिवाय 23 वर्षाखालील सेनादलाच्या प्रवीण पाटील आणि विनायक पाटील यांनी आपापल्या वजन गटात निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -