घरदेश-विदेशWrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनात सचिन तेंडूलकरची एंट्री; राष्ट्रवादी...

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनात सचिन तेंडूलकरची एंट्री; राष्ट्रवादी…

Subscribe

सचिन आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तसाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की , तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंच्या स्माइल अँबेसिडर होशील, असं क्रास्टो यांनी लिहिलं आहे

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करुन त्यांना पदावरुन हटवावे, यासाठी आंदोलन गेल्या महिनाभरापासून राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर छेडलं आहे. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी सरकारविरोधात संघर्ष छेडला आहे. गेल्या महिनाभरपासून सुरु असलेल्या आंदोलनाची शासन नोंद घेत नसल्याने आता कुस्तीपटू गंगेत त्यांचे मेडल्स विसर्जित करण्यासाठी गेले होते परंतु शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या समजवण्यावरुन त्यांनी आपला निर्णय मागे घेतला.  आता यात राष्ट्रवादीने दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकर याला ओढलं आहे तसचं, त्यााल खोचक सल्लाही दिला आहे.  ( Wrestlers Protest Sachin Tendulkar Entry In Wrestlers Protest Nationalist Congress leader clyde crasto commented )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी सचिन तेंडूलकरला उद्देशून म्हटलं आहे की, प्रिय सचिन, हे ऐकून आनंद झाला की भाजपच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी स्माइल अँबेसि़डर म्हणून तुझी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तुला माहितीय का, याच भाजपाने त्यांचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिणी घालत आपल्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतलं आहे.

- Advertisement -

सचिन आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तसाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की , तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंच्या स्माइल अँबेसिडर होशील, असं क्रास्टो यांनी लिहिलं आहे.

- Advertisement -

ब्रीजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून या वर्षी जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पूनिया, रवी दहिया आदींच्या नेतृत्वात जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यास सुरूवात केली होती. ज्यानंतर या देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. ज्यानंतर केंद्रातील सरकारने या आंदोलक कुस्तीपटूंसोबत चर्चा करण्यास सुरूवात केली. पण आंदोलक कुस्तीपटू चर्चेच्या माध्यमातून पण ऐकायला तयार नसल्याने अखेरीस क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. बॉक्सर मेरी कोम यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. जी अद्यापही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आता मात्र कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -