घरदेश-विदेशपुढचे पाऊल उचलले आणि जो बायडेन यांचा तोल गेला..., सुदैवाने गंभीर दुखापत नाही

पुढचे पाऊल उचलले आणि जो बायडेन यांचा तोल गेला…, सुदैवाने गंभीर दुखापत नाही

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी (1 जून) यूएस एअर फोर्सच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर जो बायडन आपल्या गाडीच्या दिशेने जात असताना स्टेजवरून अचानक पाय अडकून खाली पडले. (The next step was taken and Joe Biden fell off his balance)

चालताना पाय घसरून खाली पडणे ही सर्वांसाठी सामान्य गोष्ट असली तरी एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्ती अशाप्रकारे पडला तर त्याची चर्चा होताना दिसते. अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडन काल पाय अडकून पडल्यानंतर अशी चर्चा होताना दिसली. यूएस एअर फोर्सच्या अकादमीतील कार्यक्रम जो बायडन यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केले. हस्तांदोलन करुन कॅडेट तेथून पुढे जातो. त्यानंतर बायडेन देखील तेथून पुढे जाण्यास निघाले. त्यावेळी स्टेजवर त्यांचा पाय अडकून ते खाली पडले. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीच्या दिशेने गेले.

- Advertisement -

जो बायडन 2024 च्या राष्ट्रपती पदाच्या निवणुकीसाठी इच्छुक
अमेरिकेच्या राजकारणातील जो बायडन हे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत. ते 2024 च्या राष्ट्रपती पदाच्या निवणुकीसाठी इच्छुक आहेत, परंतु काल ते पाय अडकून पडल्यानंतर अनेकांना त्यांच्या तब्येची काळजी वाटत होती. मात्र काळजी करण्याचे कारण नाही. जो बायडन यांची प्रकृती स्थिर आहे. बायडन यांना गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे.

यापूर्वीही जो बायनड अडखळून पडले होते
फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये जो बायडन अडखळून पडले. याआधी जून 2022 मध्येही लॉस एंजेलिसच्या फ्लाइटमध्ये चढत असताना त्यांचा अचानक तोल गेला होता. त्याआधी मे 2022 मध्ये अँड्र्यूज एअर फोर्स बेसवर विमानात चढताना त्यांचा तोल गेला होता, परंतु हँडरेल्सच्या मदतीने त्यांनी स्वतःला सावरले होते. 2022 मध्ये अमेरिकेतील डेलावेअर बीचवर सायकल अचानक थांबवत असताना बायडन यांचा तोल गेला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -