घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनिफाडमध्ये 'लव्ह जिहाद'; उगावमधील १८ वर्षीय मुलीचे अपहरण; सोमय्यांनी घेतली एसपींची भेट

निफाडमध्ये ‘लव्ह जिहाद’; उगावमधील १८ वर्षीय मुलीचे अपहरण; सोमय्यांनी घेतली एसपींची भेट

Subscribe

नाशिक :  निफाड तालुक्यातील उगावमधील १८ वर्षीय मुलीस २८ वर्षीय विवाहीत मुस्लिम तरुणाने फूस लावून परराज्यात नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करून अपहरणकर्त्या तरुणाच्या तावडीतून मुलीची सुटका केली व मुलीचा ताबा पालकांना दिला. हा लव्ह जिहादचा प्रकार असून, मुलीचे अपहरण करणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.१) रात्री संशयित आरोपी रईस फकीर मोहम्मद सय्यद (रा. निफाड) याला संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली.

विशेष म्हणजे या घटनेविषयी चर्चा करण्यासाठी सोमय्या हे मुंबईहून खास नाशिकला आले होते. त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक (एसपी) शहाजी उमाप यांची गुरुवारी (दि.१) भेट घेत कारवाईची मागणी केली. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, उगावमध्ये २८ वर्षीय विवाहित रईस सय्यद याला दोन मुले असतानाही त्याने मुलीला फूस लावून अजमेरला नेले. या ठिकाणी त्याने तिला तावीज बांधले. याप्रकरणाची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी वेगाने तपास करून ४८ तांसात मुलीची सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात दिले. मात्र, मुलीला फूस लावून नेणार्‍या युवकावर कठोर कारवाई झाली पाहजे, अशी मागणी मुलीच्या पालकांसह सोमय्या यांनी पोलिसांकडे केली. हा लव्ह जिहादचा प्रकार असून, याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याचे सोमय्यांनी सांगितले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दौलताबादहून आरोपीस अटक

संशयित आरोपी रईस फरार झाला होता. त्याला पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथून अटक केली. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात पोस्कोसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -