घरमुंबईमुंबईत सर्वत्र व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो

मुंबईत सर्वत्र व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो

Subscribe

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या व्होटर वेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपॅट) मशीनचा डेमो मुंबईतील मतदारांना पहायला मिळत आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबतचा विश्वास वाढावा या व्हीव्हीपॅट मशीनच्या डेमोचा मुख्य उद्देश आहे. पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणार्‍या व्हीव्हीपॅट मशीनचा पहिला वहिला अनुभव यानिमित्ताने मतदारांना मिळत आहे.

संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात व्हीव्हीपॅट मशीन असलेल्या मोबाईल व्हॅन फिरत आहेत. त्यामध्ये रेग्युलर बॅलेट युनिटसोबतच नव्याने वापरात येणार्‍या व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश आहे. मतदारांचे मतदान शिक्कामोर्तब करणारी मशीन म्हणून व्हीव्हीपॅट मशीन ही उपयुक्त आहे. एकंदरीतच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता वाढावी आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास वाढावा हा संपूर्ण अभियानाचा उद्देश असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. सत्यनारायण बजाज यांनी दिली. संपूर्ण मुंबई उपनगरांमध्ये २६ पथकांच्या माध्यमातून २६ मतदारसंघांपर्यंत ही व्हीव्हीपॅट मशीन पोहचणार आहे. दररोज चार ठिकाणी ही मशीन नागरिकांना पाहता येईल.

- Advertisement -

सध्या मोबाईल व्हॅनसोबतच जनजागृतीसाठी चार जणांची टीम आणि एक सुरक्षा रक्षक आहे, तसेच मशीनचा डेमो प्रत्यक्ष पाहणे हे नागरिकांना शक्य होत आहे. आपण केलेल्या मतदानाची पावती व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून पाहणे हे मशीनमुळे शक्य होत आहे. मतदारांना पावती पाहता येईल. पण, ही पावती समांतर रेकॉर्ड म्हणून आयोगाकडेच राहणार आहे. नागरिकांना आपल्या मतदानाबाबत खातरजमा म्हणून व्हीव्हीपॅट मशीन यंदाच्या निवडणुकीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठीची माहिती नागरिकांना मिळावी हा उद्देश असल्याचे बजाज यांनी सांगितले. याआधी पालघर निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -