घरदेश-विदेशमेघालय खाण दुर्घटना - ३५ दिवसानंतर मिळाले पहिले शव

मेघालय खाण दुर्घटना – ३५ दिवसानंतर मिळाले पहिले शव

Subscribe

मेघालय येथील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. शोधमोहिम सुरु होऊन ३५ दिवस पूर्ण झाले आहे. आज नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एका मजुराचा मृतदेह हस्तगत केला आहे.

मेघालय येथील अनधिकृतरित्या सुरु असलेल्या कोळशाच्या खाणीत अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत. भारतीय नौदलाच्या वतीने हे प्रयत्न करण्यात येत आहे. या शोध मोहिमेत एका मजुराचा मृतदेह २०० फूट आत सापडला आहे. या खाणीत १५ मजूर काम करत होते. मेघालय राज्याच्या पूर्वेला जैंतिया हिल्स जिल्ह्यात ही कोळशाची खाण आहे. या खाणीत १३ डिसेंबरपासून हे मजूर अडकले आहेत. इतक्या दिवसापर्यंत अडकलेल्या मजुरांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. भारतीय नौदलाच्या वतीने अंडर वॉटर टीमच्या साहाय्याने यांचा शोध घेतला जात आहे. सध्या उच्च दाबाच्या मोटार वापरून पाणी बाहेर काढले जात आहे. नौदलाने आज एक शव बाहेर काढल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

- Advertisement -

चमत्कार घडून सुखरुप परततील

या खाणीमधून कोळसा काढण्यासाठी शिडीने खाणीमध्ये उतरावे लागते. त्यामुळे अनेकदा दुर्घटना होतात. या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच जण आहेत. जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण वाचणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -