घरदेश-विदेशमेघालय खाणीत अडकलेले अजूनही मृत्यूच्या छायेत

मेघालय खाणीत अडकलेले अजूनही मृत्यूच्या छायेत

Subscribe

खाणीशेजारी असणाऱ्या नदीला पूर आल्याने पाणी खाणीमध्ये घुसल्यामुळे हे कामगार आत अडकून पडले आहे. एनडीआरएफच्या टीमकडून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मेघालयमध्ये सध्या अवैध खाण व्यवसाय जोरात सुरू असून कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. मेघालयमध्ये कोळसा खाण खोदकामा दरम्यान नदीला पूर आल्याने १५ कामगार खाणीत अडकले आहेत. १३ डिसेंबरपासून हे कामगार खाणीत अडकले असून अद्याप त्यांना बाहेर काढण्यात आले नाही. त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. काही तरी चमत्कार होऊन हे सर्व कामगार बाहेर येतील अशी आशा त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मेघालय राज्याती पूर्व जैतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणीचे बेकायदेशीर रित्या काम सुरु आहे. त्याठिकाणच्या एका खाणीत हा प्रकार घडला आहे. खाणीशेजारी असणाऱ्या नदीला पूर आल्याने पाणी खाणीमध्ये घुसल्यामुळे हे कामगार आत अडकून पडले आहे. एनडीआरएफच्या टीमकडून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान खाणीच्या आतून घाण वास येत आहे. त्यामुळे या कामगारांच्या जिवंत असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बचावकार्य युध्दपातळीवर सुरु

मेघालयचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री कर्मेन श्यल्ला यांनी सांगितले की, देवाची कृपा आणि चमत्कार त्यांना जीवंत ठेवण्यासाठी मदत करु शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी खाणच्या जवळ असलेल्या नदीलापूर आले त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले. एनडीआरएपची १०० जणांची टीम कोळसा खाणीजवळ आहेत. मात्र अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. असे सांगितले जात आहे की, ही खाण खूप जुनी आणि अवैध आहे. अशाप्रकारची खाण मेघालयसाठी सामान्य आहे. ही खाण धोकादायक आहे.

- Advertisement -

चमत्कार घडून सुखरुप परततील

या खाणीमधून कोळसा काढण्यासाठी शिडीने खाणीमध्ये उतरावे लागते. त्यामुळे अनेकदा दुर्घटना होतात. या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच जण आहेत. जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण वाचणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशा आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

मेघालयामध्ये पूर, १३ कामगार खाणीत अडकल्याची भीती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -