घरक्रीडाजगज्जेता टेनिसपटू राफेल नदाल निवृत्ती घेणार?

जगज्जेता टेनिसपटू राफेल नदाल निवृत्ती घेणार?

Subscribe

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल सध्या ‘फ्रेंच ओपन’ स्पर्धा खेळत आहे. जर्मन खेळाडू मार्टरर सोबत त्याचा नुकताच सामना झाला. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने केलेल्या सूचक विधानातून तो टेनिसमधून निवृत्ती घेतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राफेलचं विधान काय सुचवत?

मार्टरर सोबतचा सामना जिंकल्यानंतर बोलताना राफेलने सांगितले “मला वयस्कर झाल्यासारखा वाटत नाही, पण मी ३२ वर्षांचा झालो आहे आणि २००३ सालापासून खेळतो आहे, मी अगदी लहान वयातच टेनिस खेळायला सुरू केले त्यामुळे माझा टेनिसपटू म्हणून आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. मी इथे आनंदी आहे. मी दररोज खेळाचा आनंद घेत असतो” राफेलच्या या विधानात त्याने आपले वय आणि आतापर्यंत खेळत असलेल्या वर्षांचा उल्लेख केल्यामुळे त्याचा हा इशारा निवृत्तीकडे होता का? असा प्रश्न टेनिसप्रेमींना पडला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत नदाल १० वेळा फ्रेंच ओपन विजेता

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेलने आतापर्यंत १० वेळा फ्रेंच ओपन ही टेनिसची स्पर्धा जिंकली आहे. आपल्या ११ व्या फ्रेंच ओपन विजयाकडे वाटचाल करणाऱ्या राफेलचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमन याच्यासोबत आहे. श्वार्ट्झमनचे या स्पर्धेतील आतापर्यंतचे सादरीकरण उत्तम राहिले आहे. यापूर्वी राफेल आणि श्वार्ट्झमन पाच वेळा आमने-सामने आले आहेत. हे सर्व सामने राफेलने जिंकले असले तरी श्वार्ट्झमनचा या वर्षीचा फॉर्म पाहता या दोघातील हा सामना चुरशीचा होईल हे नक्की!

rafel nadal
राफेल नदाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -