घरमुंबईतरुणीचा मोबाईल नंबर मिळविण्यासाठी मित्राला बदडले

तरुणीचा मोबाईल नंबर मिळविण्यासाठी मित्राला बदडले

Subscribe

तरुणीचा मोबाईल नंबर मिळविण्यासाठी दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाने दुसर्‍याला मारहाण केली . पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गुरुनानक शाळेजवळ ही घटना घडली. उल्हासनगर – 4 येथील सुभाष टेकडी परिसरात संदीप मारुती केवडे (28) हा तरुण राहतो. याच परिसरात राहणारा मिलिंद हा संदिपचा मित्र आहे. संदीप आणि मिलिंद हे गुरुनानक शाळेजवळ गप्पा मारीत असताना मिलिंदच्या बायकोची मैत्रीण त्याठिकाणी आली. तिने संदीपच्या मोबाईलवर स्वतःचा मोबाईल नंबर टाईप केला आणि ती निघून गेली. ही तरुणी तेथून निघून गेल्यानंतर मिलिंद संदीपकडे तरुणीचा मोबाईल नंबर मागू लागला. मात्र, तो नंबर मी सेव्ह केलेला नाही, असे संदीप म्हणाला. या गोष्टीचा मिलिंदला राग आला आणि त्याने संदीपला शिवीगाळ करून मारहाण केली. यासंदर्भात संदीपने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मिलिंदच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -