घरमुंबईशौचालयांच्या भिंतींवर स्वच्छतेचा संदेश

शौचालयांच्या भिंतींवर स्वच्छतेचा संदेश

Subscribe

स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावातील गावकरीच स्वखर्चाने शौचालयाच्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करत स्वच्छतेचा संदेश देत आहेत. या मोहिमेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शौचालयांचे स्वच्छ सुंदर चित्र पाहायला मिळत आहे. अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाकडून स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला 1 जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धेत सहभागी असलेल्या गावातील कुटुंबियांनी वैयक्तिक शौचालय आणि सार्वजनिक शौचालयांची रंगोरंगोटी करून स्वच्छतेबाबतचे संदेश लिहिण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक कला संस्कृतिचे दर्शन घडविणार्‍या चित्रांचा समावेश असून स्वच्छतेची जाणीव जागृती होत आहे. या अभियान कालवधीत एकूण शौचालय संख्येच्या प्रमाणात रंगवलेल्या शौचालयांच्या संख्येच्या आधारे प्रत्येक जिल्हा परिषद गटातून एका ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातून व विभागातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांक पटकावणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -