घरफिचर्ससाधे राहिल्यामुळे तुमची ओरिजनॅलिटी आणखी उठून येते - संपदा जोगळेकर

साधे राहिल्यामुळे तुमची ओरिजनॅलिटी आणखी उठून येते – संपदा जोगळेकर

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांना बोलवण्यात आलं होतं. संपदा जोगळेकर- कुलकर्णा यांनी यावेळी सर्वच प्रश्नांची अगदी दिलखुल्लास उत्तर दिली.

सध्याच्या अभिनेत्री ग्लॅमरस राहावे याकडे सर्वात जास्त भर देत असतात. मात्र मराठी चित्रपत्रसृष्टीमध्ये अशीही एक अभिनेत्री आहे जी ग्लॅमरसच्या जाळ्यात अडकलेली नसून सुध्दा खूप कर्तृत्ववान आहे. आम्ही बोलतोय अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्याबद्दल. संपदा जोगळेकर – कुलकर्णी या एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, लेखिका, निर्माता, दिग्दर्शिका आहेत. ‘एखाद्या कृतीची जबाबदारी दिग्दर्शकावर असते. सगळ्याचे श्रेय आणि अपश्रेय ज्या पदाला मिळते तो म्हणजे दिग्दर्शक असते. या पदावर पोहचण्याचे माझे स्वप्न होते’, अशी प्रतिक्रिया संपदा यांनी दिली. mymahanagar.com च्या फेसबुक लाइव्हवर ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये संपदा जोगळेकर – कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी त्यांची अभिनेत्री ते दिग्दर्शक आणि निर्मातापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

स्वत:ची ओळख जपता आली पाहिजे

‘साधं राहणं सोपं असते हा सगळ्यात प्रामाणिक विचार आहे. साधं राहायचं ठरवले तर त्यामध्ये काहीच आव आणावा लागत नाही. आहात तसे दिसा तसे वागा. साधे राहिल्यामुळे तुमची ओरिजनॅलिटी आणखी उठून येते. तुम्ही कोणासारखे दिसत नाही. मी संपदा आहे मला संपदा म्हणून बघा. मी कोण वेगळी असं पण नाही. हाताचा पंजा हा आपलाच असतो तसा दुसऱ्याचा नसतो तशी स्वत:ची ओळख जपता आली पाहिजे. स्त्री ही सुंदर असते पण त्यापलिकडे ती काय असते हे बघायला तुम्ही शिकायला पाहिजे. जे आहोत ते मेनटेन करुया ते सोपं आहे. मला नाही सोळा- सतरा वर्षाचे रोल करायचे किंवा तीस वर्षाचे रोल करायचे मी ४७ वर्षाची आहे तसंच मला पहा. कारण अनुभवाची एक वेगळी गंमत आहे’, असं त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ऑल द बेस्टपासून चिसौका रंगभूमी प्रवास

‘मी अभिनय क्षेत्रात पुढे येईल असे कोणालाच वाटले नव्हते. शाळेत असताना आठवी, नववीपर्यंत शाळेला माहिती नव्हते की, अशी मुलगी आपल्या शाळेत. आहे. मी कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे नाही. दहावीमध्ये सर्व हुशार विद्यार्थी अभ्यास करायला लागली. त्यावेळी ही संधी आहे आणप सर्व स्पर्धात भाग घेऊया. त्यावेळी माहिती नाही काय जादू झाली मी बक्षिस मिळवत गेले. अक्षर स्पर्धा, निबंध लेखन, नृत्य, वकतृत्व या स्पर्धेत पारितोषीक मिळवत गेले. कॉलेजमध्ये आयएनटी, उन्मेश एकांकीका स्पर्धेत मी सहभागी होत गेले. राज्य नाट्याच्या व्यवसायिक स्पर्धेत अभिनेत्री म्हणून प्रथम पारितोषीक मिळवले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर ‘आईचे घर उन्हात’ या व्यवसायिक नाटकासाठी मला संधी मिळाली. ‘घर तिघांचं हवं’ या नाटकामध्ये काम मिळाले. त्यानंतर ऑल द बेस्ट’ या नाटकात मला काम मिळाले, असा नाटकामध्ये येण्यापर्यंतच प्रवास संपदा यांनी सांगितला.

नाटक जीवंत कला आहे

‘नाटकाला प्राधान्य देण्यामागचे कारण म्हणजे ‘नाटक ही सळसळते आणि जीवंत कला मला वाटते. चुका तुम्हाला लगेच कळतात. तुमच्या सबळ बाजूची प्रेक्षक लगेच दाद देतात. देणं-घेण्याचा लगेच त्याठिकाणी अनुभव घेणे यासारखी दुसरी कला नाही. असा क्षणांमध्ये जास्त जबाबदारी असते. त्यासोबत त्या क्षणाला सामोरे जाण्यासाठी मोठी तयारी लागते. यामुळेच नाटक आणि नृत्य या दोन्ही कला मला आवडतात. कारण त्या जास्त आव्हानात्मक असतात कारण त्या आता चाललेला श्वास देखील मोजत असतात’, असे संपदा यांनी सांगितले.

- Advertisement -

नाटकावर माझे प्रेम

‘नाटकं हे माझं प्राधान्य कधीच नव्हते. मी एमए, एमफीएल केले, पीएचडीची तयारी सुरु होती. शैक्षणिक प्रबळ असावे असं माझं घरं होतं. माझे आजोबा मुख्याध्यापक होते, आत्या आणि आई शिक्षिका होत्या. नाटकं असं वळणार येणारी गोष्ट होती. आवडलं की करायचे नाही आवडले तर नाही करायचे. मला कुठलीही कलाकृती बळजबरीने केली नाही. मी हुकुमी एक्के ठरत गेली. मला आवडलं म्हणून मी १०० टक्के देत गेले. नाटकावर माझे प्रेम होते. कारण लहानपणापासून मी नाटक पाहत होते. मला व्यक्त व्हायला आवडते. कविता, निबंध, लेख, ललित लेख, वैचारिक लेख, पुस्तकातून मला व्यक्त व्हायला आवडते. मी नाटकवाली असा लोकांनी मला शिक्का मारला गेला. मी गेली कुठे असे त्यांना वाटले पण मी कुठेना कुठे होते. माझं लग्न झाल्यानंतर मी ‘ताक धिना धिन केले’, ‘भविष्यावर बोलू काही’ यामध्ये काम केले असल्याचे संपदा यांनी सांगितले.

दुसऱ्याचे अनुकरण करायला आवडत नाही

‘प्राध्यापकिय आणि शिक्षकीय वातावरण असल्यामुळे शब्दांना महत्व होते. माझ्या घरी अनेक पुस्तकं होती. कित्येक लायब्ररीचे पत्ते मला माहिती होते. तिथे गेले पाहिजे पुस्तक वाचले पाहिजे. मला याचा निवेदनासाठी खूप फायदा झाला. निवेदनातून माल मनोरंजन आणि प्राध्यापकिय दोन्ही मिळत होते. माझा एक वर्ग मी तयार केला. मला कोणाची अनुकरण करायला आवडत नाही त्यामुळे स्वतंत्र शैली तयार झाली. चुका झाल्या. चुकांना वाव ठेवत मी मोठी झाले. त्यामुळे निवेदन हा माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा झाला त्यामुळे मला त्रास नाही झाला’, असे मत सपंदा यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -