घरमनोरंजनइयर डाऊन दुसर्‍या पर्वाची सुरुवात

इयर डाऊन दुसर्‍या पर्वाची सुरुवात

Subscribe

‘मालिका सुरू करताय, थोडं सबुरीने निर्णय घेऊया’, हा सल्ला आता वाहिनीवाल्यांबरोबर मालिकेचे निर्मातेसुद्धा देऊ लागलेले आहेत. संतोष जुवेकर, प्रणाली घोगरे अभिनीत ‘इयर डाऊन’ ही मालिका सोनी मराठीवर दाखवली जाते. ठरवले असते तर या मालिकेचे भाग तसेच पुढे चालू ठेवता आले असते; पण आता त्यांनी याच महिन्यात या मालिकेला ‘दुसरे पर्व’ हा शब्द जोडून याच महिन्यात त्याचे पुढचे भाग दाखवणे सुरू करणार आहेत.

‘इयर डाऊन’च्या कथेत जन्मेयने डिगरी पूर्ण केलेली आहे. पुढे तो काय करणार हे दुसर्‍या पर्वात दाखवले जाणार आहे. समीर पाटील हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. सर्व थरातील प्रेक्षकांना ही मालिका आवडावी यादृष्टीने जे बदल केलेले आहेत ते नव्या पर्वात पहायला मिळणार आहेत. संतोषने यापूर्वी साहसी, रफटफ अशा व्यक्तीरेखा साकार केलेल्या आहेत. यातले त्याचे वेगळे रुप प्रेक्षकांना अधिक भावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -