घरमनोरंजन'झिरो'मधून झळकणार दोन 'हिरो', टीझर लाँच

‘झिरो’मधून झळकणार दोन ‘हिरो’, टीझर लाँच

Subscribe

सलमान आणि शाहरूखमधील प्रेम, भांडण, मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या 'रेस ३' चित्रपटाबरोबरच 'झिरो'चं टीझर रिलीज करणार आहेत.

सलमान आणि शाहरूखमधील प्रेम, भांडण, मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या ‘रेस ३’ चित्रपटाबरोबरच ‘झिरो’चं टीझर रिलीज करणार आहेत. याच मुहूर्तावर रिलीज करण्यात आलेला हा टीझर फारच कमी वेळात ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

शाहरूख आणि सलमान पुन्हा एकत्र

सलमान खान आणि शाहरूख खान हे दोन्ही हिरो असे आहेत, ज्यांचे संपूर्ण जगामध्ये कोट्यावधी चाहते आहेत. मध्यंतरी आलेल्या दुराव्यानंतर हे दोघे परत स्क्रिनवर कधी दिसणार? याकडे सगळ्यांच लक्ष होतं. आता ही प्रतिक्षा संपली आहे. शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘झिरो’मध्ये सलमान आणि शाहरूखच्या मैत्रीची ही केमिस्ट्री चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपटात बबुआ सिंग ही भूमिका साकारत असलेल्या शाहरूखबरोबर सलमान खान गाण्यामध्ये थिरकताना दिसत आहे. या दोन पठाण हिरोंच्या केमिस्ट्रीनं इंटरनेटवर धुमाकूळ माजवला आहे, याबद्दल नक्कीच दुमत नाही.

- Advertisement -
Shah-Rukh-Khan starrer Zero teaser
सलमान खान आणि शाहरूख खान ‘झिरो’ चित्रपटाच्या टीझरमध्ये

जावेद जाफरीचा जबरदस्त आवाज

या गाण्यापूर्वी असलेला जावेद जाफरीचा जबरदस्त आवाज हे या टीझरचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या गाण्याच्या ओळींना जावेद जाफरीनं पुरेपूर न्याय दिला आहे. या आवाजानं गाण्यामध्ये एक वेगळीच धमाल आली आहे. सर्वात शेवटी सलमानच्या कडेवर बसलेला शाहरूख प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. ईदच्या दिवशी सर्व चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.

Shah-Rukh-Khan-starrer-Zero-teaser
सलमानच्या कडेवर बसलेला शाहरूख प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय

या चित्रपटामध्ये शाहरूख खानबरोबर अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ असून चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. यावर्षी २१ डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल. तर सलमान आणि शाहरूखने यापूर्वी आपल्या मैत्रीसाठी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -