घरमनोरंजनमहिला चित्रपट महोत्सव

महिला चित्रपट महोत्सव

Subscribe

प्रभात चित्र मंडळाने निमित्त घेऊन मुंबईकरांना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय असे दखल घ्यायला लावणारे चित्रपट दाखवलेले आहेत. युवक वर्गाकडूनसुद्धा जरा हटके अशा या चित्रपटांचे स्वागत झालेले आहे. 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाचे निमित्त घेऊन प्रभातने महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. त्यातसुद्धा त्यांनी एक वैशिष्ठ्य ठेवले आहे ते म्हणजे जे महिलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत, त्यांचा या महोत्सवात समावेश आहे. 5 ते 7 मार्च पुढे 18, 19 मार्च या दिवशी दादर माटुंगा कल्चरल सेंटर व नरिमन पॉईंट इथल्या चव्हाण सेंटरमध्ये हा महोत्सव होणार आहे. ज्येष्ठ लेखिका शांता गोखले आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल सुखटणकर हे उपस्थित राहतील.

मानसी देवधर दिग्दर्शित भैरु हा लघुचित्रपट, शिवाय इजिप्तच्या हाला खलील यांचा नवरा यांच्या चित्रपटांनी महोत्सवाला प्रारंभ होईल. असफिया ट्रॅन्पोलीन, नोदिजन, टॉकिंग विथ द विंड, पाथेर संधान, हमीद दलवाई द अनसंग ह्युमनिस्ट या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश आहे. जगभरातील निवडलेले हे सर्वोत्तम चित्रपट, लघुपट आहेत. प्रभात चित्र मंडळाबरोबर पुन्हा स्त्रीउवाच डॉट कॉम, फेडरेशन ऑफ फिल्म्स सोसायटीज ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा महोत्सव होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -