घरदेश-विदेशसीमेवर भारतीय लढाऊ विमानांचा जोरदार सराव!

सीमेवर भारतीय लढाऊ विमानांचा जोरदार सराव!

Subscribe

पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यामुळेच लढाऊ विमानांनी काल रात्रीचा हा सराव करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भारताच्या लढाऊ विमानांनी गुरुवार रात्री सीमारेषेजवळ जोरदार सराव केला. भारतीय हवाई दलातील अनेक लढाऊ विमानांचा या सरावामध्ये सहभाग होता. या विमानांचं उड्डाण अमृतसर आणि पंजाबमधील सीमारेषेवर करण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामाध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राकनंतर सीमारेषेवर सातत्याने तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर काहीतरी खुरापती केल्या जात असल्याचं वृत्तही समोर आलं आहे. दरम्यान, पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यामुळेच लढाऊ विमानांनी काल रात्रीचा हा सराव करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी भारतीय एअरफोर्सच्या विमानांनी अमृतसरसहित सीमारेषेवर सुपरसॉनिक गतीने उड्डाण घेत तयारीचा एकंदर आढाव घेतला.

या विशेष सरावामध्ये फ्रंटलाइन फायटर प्लेनही सहभागी झाले होते. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची तळे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन पाकिस्तानी फायटर विमानांनी १३ मार्चला रात्री उशिरा भारतीय हद्दीजवळून उड्डाण केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल हाय अलर्टवर आहे. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेजवळ ही पाकिस्तानी विमाने उड्डाण करत होती. त्यामुळे एकंदरच पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर भारतीय हवाई दलाचे नियमीत लक्ष आहे.

- Advertisement -

बुधवारी रात्री पाकिस्तानला लागून असणाऱ्या पंजाबमधील अमृतसरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. त्यावेळी हा आवाज नेमका कशाचा याची नक्की माहिती स्थानिकांना मिळत नव्हती. मात्र, विमानांचा सराव सुरु असताना जवळून जाणाऱ्या एखाद्या विमानाचा हा आवाज असेल, असा अंदाज स्थानिकांद्वारे लावण्यात येत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -