घरदेश-विदेशकेंद्र सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; अर्धाच फडकणार तिरंगा

केंद्र सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; अर्धाच फडकणार तिरंगा

Subscribe

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांचे आज दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. पर्रिकरांच्या निधनानंतर केंद्र सरकारने १८ मार्च रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व राज्यातील राजधान्यात भारताचा तिरंगा अर्ध्यावरच फडकवणार असल्याचेही केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे. गोवा येथे (दि. १८ मार्च) पर्रिकर यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पर्रिकरांच्या निधनामुळे सोमवारी होणारे राजकीय पक्षांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. भाजप – शिवसेना युतीचा पुणे आणि नवी मुंबई येथे होणारा कार्यकर्ता मेळावा सुद्धा रद्द करण्यात आला आहे.

१८ मार्च रोजी गोव्यातील अंत्यसंस्काराचा पुर्ण कार्यक्रम –

  • सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत पणजी येथील भाजपच्या कार्यालयात पर्रिकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
  • सकाळी १०.३० वाजता कला अकादमी येथे त्यांचे पार्थिव आणले जाईल.
  • सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत गोव्यातील जनता मनोहर पर्रिकर यांचे अंतिम दर्शन घेऊ शकेल.
  • दुपारी ४ वाजता एसएजी मैदानावर अंत्यसंस्काराला सुरुवात होईल.
  • दुपारी ४.३० वाजेपर्यंत एसएजी मैदानावर सर्व विधी पार पडतील.
  • दुपारी ५ वाजता अंतिमकार्य संपन्न होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -