घरदेश-विदेशकपड्यांवरून गडकरींनी दिला होता पर्रिकरांना 'असा' सल्ला

कपड्यांवरून गडकरींनी दिला होता पर्रिकरांना ‘असा’ सल्ला

Subscribe

जेव्हा पर्रिकर दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा मी त्यांना आपले कपडे बदलण्याबद्दल सांगितले. दिल्लीतील असणाऱ्या थंडीची कल्पना देत हाफ शर्ट दिल्लीत चालत नाही. यांवर ''मी असाच राहिल.'' असे मनोहर पर्रिकर यांनी उत्तर दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर दुखः व्यक्त केले आहे. पर्रिकरांच्या जाण्याने पोकळी निर्माण झालीच परंतु देशासोबत भाजपाचे खूप नुकसान झाले. त्यांनी आपले पुर्ण आयुष्य गोवा आणि भाजपाकरिता समर्पित केले होते. असे नितीन गडकरी यांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी मनोहर पर्रिकरांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले हे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात समजले.

आठवणी सांगतांना भावुक

पर्रिकरांच्या आठवणी सांगतांना गडकरी भावुक झाले. ”पर्रिकर हे फक्त राजकीय नेता नव्हते. ज्यावेळी भाजपाने माझ्यावर गोव्याची जबाबदारी सोपवली त्यावेळी मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक, संजीव देसाई आणि दिगंबर कामत या चौघांसोबत काम केले होते. त्यांच्या जीवनातील राजकीय सुरूवात बघितली आहे्”. असे गडकरींनी सांगितले.

- Advertisement -

साधारण वर्तवणूक

आयआयटी अभियंता झाल्यानंतरही त्यांची वर्तवणूक अगदी साधारण होती. मुख्यमंत्री झाल्यावर देखील आपल्या राहणीमानात आणि वेशभूषेत कोणताही बदल केला नव्हता. यासोबतच, आपल्या स्वभावात देखील कोणताच बदल केला नाही. तसेच देशाचे संरक्षण मंत्री बनल्यावर ते तसेच होते. जेव्हा पर्रिकर दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा मी त्यांना आपले कपडे बदलण्याबद्दल सांगितले. दिल्लीतील असणाऱ्या थंडीची कल्पना देत हाफ शर्ट दिल्लीत चालत नाही. यांवर ”मी असाच राहिल.” असे मनोहर पर्रिकर यांनी उत्तर दिले.

आयुष्य गोव्यास समर्पित

यावेळी गडकरींनी असे सांगितले की, ”पर्रिकरांच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक जीवनातील चांगला मित्र गमावला. संपुर्ण आयुष्य त्यांनी गोव्यास समर्पित केले होते. त्यांची जिद्द, ईच्छा शक्ती बघून नेहमीच आश्चर्य वाटत होते आणि त्यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा धक्काच बसला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -