घरमनोरंजनशास्त्रीजींच्या जीवनावर लवकरच येतोय; ‘द ताश्कंद फाईल्स’

शास्त्रीजींच्या जीवनावर लवकरच येतोय; ‘द ताश्कंद फाईल्स’

Subscribe

लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य उलघडणारा ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सन २०१९ मध्ये राजकारणी नेत्यांचे चित्रपट येण्याची यादी ही वाढतच जात आहे. या वर्षाच्या सुरूवातीला ११ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट आला. त्यानंतर २५ जानेवारी रोजी दिवंग्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट आला. तसेच ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट आहे. तर याच यादीत आता आणखीन एका चित्रपटाची भर पडते आहे. तो चित्रपट म्हणजे ‘द ताश्कंद फाईल्स’. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच ताश्कंद करारावर भाष्य करणारा असणार आहे.

Mithun Chakraborty is #ShyamSundarTripathi#TheTashkentFiles trailer on 25 March 2019… Costars Naseeruddin Shah, Shweta Basu Prasad, Pankaj Tripathi, Vinay Pathak, Mandira Bedi, Pallavi Joshi and Ankur Rathee… Directed by Vivek Ranjan Agnihotri… 12 April 2019 release. pic.twitter.com/VzquCngLGd

- Advertisement -

— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2019

ताश्कंद करार नेमक काय?

ताश्कंद हा शांततेचा करार होतो. जो भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० जानेवारी १९६६ रोजी करण्यात आला होता. १९६५ च्या भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला युद्धात पाकिस्तान पराभव होण्याच्या वाटेला होता. त्याच वेळी पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने ताश्कंद कराराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. रशियाच्या दबावानंतर शास्त्रीजी जिंकलेला प्रदेश त्यांना परत करावा लागला होता. या करारामध्ये भारताच्या वतीने दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तर पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांनी या करारावर सह्या केल्या होत्या. ताश्कंद या शांततेच्या करारावर सहिकरून १२ तास उलडले नाही तर ११ जानेवारीला १९६६ मध्ये लाल बहादुर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला.

- Advertisement -

Know anything about the mysterious death of #LalBahadurShastri? Then please mail the information at [email protected]. #TheTashkentFiles #TheTashkentStory https://t.co/ALjH5gLmso

— The Tashkent Files (@TashkentMovie) February 9, 2018

या चित्रपटाबद्दल

लाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूचे रहस्य ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटातून उघट होणार आहे. मागील वर्षी याच चित्रपटाच्या टिमने एक ट्विट करून ज्यांना लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूच्या रहस्याबद्दल माहिती आहे, तर त्यांनी ती आम्हाला द्यावी असे सांगितले होते. या चित्रपटासाठी ३ वर्ष संशोधन चालू होत. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी द ताश्कंद फाईल्स हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या भूमिकेत मिथून चक्रवर्ती दिसणार आहेत. त्यांच्या सोबत नसीरूद्दीन शहा, श्वेता बसू प्रसार, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Know anything about the mysterious death of #LalBahadurShastri? Then please mail the information at [email protected]. #TheTashkentFiles #TheTashkentStory https://t.co/ALjH5gLmso

— The Tashkent Files (@TashkentMovie) February 9, 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -