घरमुंबईराष्ट्रवादीच्या जाहीरम्याचा अर्थ सांगा आणि खासदार व्हा - तावडे

राष्ट्रवादीच्या जाहीरम्याचा अर्थ सांगा आणि खासदार व्हा – तावडे

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीरनाम्यातून नेमकं काय म्हणायचे आहे हे त्यांनाच कळलेले नाही. या जाहीरनाम्याचा अर्थ जो कोणी सांगेल त्याला खासदार बनवू असं म्हणतं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहाजिकच  आता आरोप-प्रत्यारोपाला देखील जोर येऊ लागला आहे. आज तर राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीर नाम्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जो जाहीरनामा सादर केला आहे तो इतका बालिश आहे की, जो या जाहीर नाम्यातील वाक्याचा अर्थ समजावून सांगेल त्याला बिनविरोध खासदार करू असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर नाम्यावर जोरदार टीका केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीरनाम्यातून नेमकं काय म्हणायचे आहे हे त्यांनाच कळलेले नाही. त्यामुळे समोर पराभव दिसू लागल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसने असा जाहीर नामा बनवला असावा असे मला वाटतं असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली. मुंबई भाजपच्या कार्यालयात विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीला पराभव दिसू लागला आहे

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या किती नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वाचला देव जाणो. हा जाहीर नामा कुणीतरी  कर्मचाऱ्यांने बनवल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या जाहीर नाम्यात मोदींची स्तुती केल्याचे म्हटलं आहे. तसेच जाहीर नामा करताना जबाबदार व्यक्तीने तो वाचलेला नाहीये, जे २० जागा लढत आहेत ते आता देशाच्या विकासाची भाषा करत असल्याची टीका तावडे यांनी यावेळी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला काय म्हणायचे आहे तेच कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मनसेच्या पोटात दुखतं

- Advertisement -

दरम्यान यावेळी विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मोदी काही बोलले तरी काही लोकांच्या पोटात दुखत तसेच ते बरळायला लागतात. मात्र त्यांना कदाचित माहित नसावे जगात अशा घोषणा हे त्या त्या देशाचे प्रमुख करत असतात. त्यामुळे मोदींनी घोषणा केल्यावर एवढं पोटात दुखायचे कारण काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -