घरमुंबईअवैध पार्कींग कराल तर तासाला दंड भरावा लागेल

अवैध पार्कींग कराल तर तासाला दंड भरावा लागेल

Subscribe

रस्त्यावर अनधिकृतरित्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन मालकांना आता प्रत्येक तासाला ५० रुपये दंड भरावा लागणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासनाच्या गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे.

रस्त्यावर अनधिकृतरित्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन मालकांना आता प्रत्येक तासाला ५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभाने घेतला आहे. या संबधी गृहविभागाकडून राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलिस आयुक्तांनी या सूचनेवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यातील अनेक शहरामध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरु असून मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची रुंदी तात्पुरती कमी झाली आहे, त्यातच रस्त्यावर अनधिकृत वाहने पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी वाहने भंगार अवस्थेत बेवारसरित्या रत्यावर पडून असल्यामुळे या वाहनांमुळे देखील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. हि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासनाच्या गृहविभागाने अनधिकृत  वाहन पार्क करणाऱ्या वाहन मालकावर प्रत्येकी तासाला ५० रुपये प्रति तास दंड वासून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- Advertisement -

या मध्ये अपघात झालेली वाहने औपचारिक बाबी पूर्ण करून नंतर दंडास पात्र ठरतील, ते वाहन जर सरकारी एजन्सीमार्फत हलवण्यात आले असता त्या एजन्सीचा ओढून नेण्याचा खर्च वाहन मालकाकडून वसूल कऱण्यात येईल असेही शासनच्या निर्णयात नमूद कऱण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -