घरमुंबईकल्याणमधून ३ लाखांची रोकड जप्त

कल्याणमधून ३ लाखांची रोकड जप्त

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे ३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना नवी मुंबई येथील उरणफाटा येथे १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा कल्याण येथे एका वाहनात ३ लाखांची रोकड आढळून आल्याची घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

मुरबाड रोडवरील पौर्णिमा पोलीस चौकी परिसरात वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी आचारसंहिता पथकाने तपासणीसाठी गाडी थांबवली होती. त्यात या गाडीमध्ये तब्बल तीन लाखांची रोकड आढळून आली आहे. याबाबत आचारसंहिता पथकाने संबंधित व्यापाऱ्याकडे विचारणा केली. मात्र त्याच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याने तसेच रक्कमेबाबत पुरावा न दिल्याने ही रक्कम महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – उरणफाटामध्ये कारमधून १० लाखाची रोकड जप्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -