घरमहाराष्ट्रनाशिकमोदींना स्वप्नातही मीच दिसत असेल

मोदींना स्वप्नातही मीच दिसत असेल

Subscribe

नांदगावच्या सभेत शरद पवारांचा टोला

राज्यात नरेंद्र मोदींनी सात सभा घेतल्या; पण प्रत्येक सभेत ते माझे नाव घेत आहेत. आता तर स्वप्नातही त्यांना मीच दिसत असेल, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रविवारी २१ एप्रिलला रात्री झालेल्या सभेत पवार बोलत होते.

ज्या घरात दोन हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता ? आधी तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा, असा खडा सवाल करीत शरद पवार म्हणाले, आपल्या सरकारने काय कामगिरी केली, हे सांगण्यापेक्षा गांधी घराणे आणि नंतर आमच्या घरावर मोदी टीका करू लागले आहेत. गांधी घराण्यातील त्यागाची त्यांना माहिती नाही. एका पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा इतिहास तत्कालीन महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रचलेला आहे. राजीव गांधी यांनी विज्ञानात देशाला प्रगतीपथावर नेले, तरीही मोदी म्हणतात काँग्रेसने काय केले? आता मोदी आमच्या घरावर टीका करू लागले आहेत. त्यामुळे मला बिनपैशाची प्रसिद्ध मिळत आहे. राज्यात सात सभा घेतल्या पण प्रत्येक सभेत ते माझे नाव घेत आहेत. आता तर स्वप्नातही ते माझं नाव घेत असावेत. शेतीमालाच्या किंमतीवर बोला, बेरोजगारी वाढली त्यावर बोला पण त्यांना देशाच्या प्रश्नापेक्षा माझ्या घराची अधिक काळजी. पण मोदी साहेब चिंता करू नका आम्ही आईच्या संस्कारात वाढलो आहोत. त्यांना संसाराचा अनुभव नसल्याने ते असे बोलत असावेत. पण सांगण्यासारखं काही नसल्याने ते व्यक्तिगत टीका करत आहेत.

- Advertisement -

विकासाचं मॉडेल म्हणून गुजरातकडे पाहीलं जातं विकासाला भुलून देशातील जनतेने त्यांना देशाची सत्ता सोपवली. परंतु आज जर पाच वर्षाची कामगिरी बघितली तर हे विकासाचं मॉडेल फोल ठरलं. आज नागरिकांना पाणी प्यायला नाही. या राज्याचे पाणी पळवण्याचे काम यांनी केले. आज सत्ता आमच्याकडे नाही; परंतु निवडणुकीनंतर एक बैठक घेऊन या भागातील पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या वाढताहेत.

शरद पवार यांच्या सभेला उपस्थित जनसमुदाय.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -