घरमुंबईरायगडमध्ये 'नोटाला' जास्त मते पडण्याची शक्यता ?

रायगडमध्ये ‘नोटाला’ जास्त मते पडण्याची शक्यता ?

Subscribe

रायगड लोकसभा निवडणुकीत नुकतेच २३ एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान संपन्न झाले आहे.या मतदार संघातून मातबर उमेदवारसह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.तर १७ व्या क्रमांकावर नोटा चा पर्याय उपलब्ध होता. नोटा म्हणजेच यापैकी कोणीही योग्य नाही.

परंतु या निवडणुकीत १ ते १६ उमेदवारांना एका मतदान मशीन मध्ये जागा देण्यात आली होती.तर १७ व्या क्रमांकावर असणाऱ्या नोटा साठी दुसऱ्या एका मतदान मशीन ची व्यवस्था करण्यात आली होती. दोन मतदान मशीन मुळे ज्याला पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मतदान करावयाचे असल्यास ग्रामीण भागातील निरक्षकर  मंडळी कडून चुकून नोटांचे बटन दाबून पहिल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान केल्याचा भास निर्माण होऊन सदरची मते नोटाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कारण सदरच्या दोन्ही मशीन अगदी शेजारी ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील निरक्षर  लोकांना प्रथम क्रमांकाचे बटन दाबा असे प्रचार करणाऱ्या पक्षाकडून प्रचार करताना  सांगण्यात येत होते.त्यामुळे दोन्ही मशीन शेजारी असल्यामुळे कदाचित दुसऱ्या मशीनचे चे प्रथम पसंतीचे बटन दाबल्याने नोटाला जास्त मते सुद्धा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा सुरुवातीलाच पहिला नंबर होता.जर सदरची परस्थिती खरोखर वास्तव्यात खरी उतरली तर याचा अनाहुत फटका गीते याना बसून नोटांची मते वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या सर्व जर तर च्या गोष्टी असून सदरचे चित्र २३ मे रोजी मतदान निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षातील लोक ग्रामीण भागातील निरक्षर लोकांना प्रचार करताना निशाणी अथवा क्रमांक सांगतात अश्यावेळी दोन मशीनमुळे ही विसंगती निर्माण होण्याची शक्यता रायगड लोकसभा मतदार होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -