घरदेश-विदेशएअर इंडियाच्या विमानाला आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

एअर इंडियाच्या विमानाला आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Subscribe

एअर इंडियाचे बी ७७७-२०० एलआर हे विमान दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को येथे जाणार होते. त्याआधी विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते तेवढ्यात विमानाला आग लागली.

दिल्लीमध्ये एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर ही घटना घडली. बुधवारी रात्री अचानक विमानाला आग लागली. सुदैवाने त्यावेळी विमानात एकही प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

- Advertisement -

एअर इंडियाच्या विमानाचे दुर्स्तीचे काम सुरु होते. एसी दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. ऑकजिलरी पॉवर युनिटला आग लागली. एअर इंडियाचे बी ७७७-२०० एलआर हे विमान दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को येथे जाणार होते. त्याआधी विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते तेवढ्यात विमानाला आग लागली. विमानात कोणी नसल्यामुळे कोणतिही अनुच्चित घटना घडली नाही. अग्निशमन दालाच्या जवानांनी ही आग विझवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -