घरदेश-विदेशपश्चिम बंगाल हिंसाचार; निवडणूक आयोगाची बैठक; भाजपा करणार आंदोलन

पश्चिम बंगाल हिंसाचार; निवडणूक आयोगाची बैठक; भाजपा करणार आंदोलन

Subscribe

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारातील दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता या संदर्भात निवडणूक आयोग विशेष आढावा बैठक घेणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार असल्याचे वृत्त असून आहे.

दरम्यान टीएमसी छात्र परिषदेच्या तक्रारीनंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपातर्फे आज जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार असून निवडणूक आयोगाची भेट घेऊन तृणमूलवर कारवाईसाठी आग्रह धरण्यात येणार आहे. ममता बॅनर्जीही आयोगाची भेट घेणार आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भाजपाच्या प्रचारासाठी प. बंगालमध्ये सभा आहे. लोकसभा निवडणूकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात कोलकातातील ९ जागांवर मतदान होत आहे.

- Advertisement -

कालच्या घटनेचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात उमटले आहेत. आज तृणमुलच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची रॅली होणार असून टीएमसी आणि डावे पक्ष भाजपाविरोधात आंदोलन करणार आहेत. भाजपा आणि तृणमुल दोन्ही पक्षांमध्ये आज वादप्रत्यारोपाचे हल्ले सुरू असून सोशल मीडियावरही वाक्‌युद्ध सुरू झाले आहे.

येथील विदयासागर महाविदय्ालयाचे प्राचार्या म्हणाले की भाजपाचा झेंडा घेऊन काल काही लोक कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी मोडतोड केली. तसेच बंगालमधील प्रसिद्ध लेखक व दार्शनिक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचीही मोडतोड केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना गुंड असे संबोधले. कालचा हल्ला हा भाजपानेच प्रायोजित केलेला होता असे आरोपही तृणमुलकडून झाले. तर मला स्वामी विवेकानंदांच्या घरी जाऊन दर्शन घ्यायचे होते, मात्र मला अडविण्यात आले, असा आरोप करत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर टिका केली आणि टीमसीच्या कार्यकर्त्यांना गुंड संबोधून त्यांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप केला.

- Advertisement -

काय घडले होते काल ?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड-शोवर कोलकातात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तेथे राडा झाला असून लोकांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. मंगळवारी अमित शहा यांचा कोलकातात रोड-शो होता. त्यांचा ताफा कोलकातातील बिधान सराई भागातून जात असताना तेथे असलेल्या हॉस्टेलजवळ शहा यांच्या ट्रकवर काठ्या भिरकावण्यात आल्या. त्यानंतर हॉस्टेलमधून शहा यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली.

त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेलला घेराव घातला आणि दगडफेक करणार्‍या विद्यार्थ्यांना पकडून चांगलाच चोप दिला. तेथे जाळपोळही झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कोलकाता विद्यापीठ मार्गावरून अमित शहा यांचा ताफा जात असताना भाजप आणि माकपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे ’पीटीआय’ने म्हटले आहे.


पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र देऊ न शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले. तणावाचे वातावरण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -