घरलाईफस्टाईलगुणकारी 'सब्जा बी'चे फायदे

गुणकारी ‘सब्जा बी’चे फायदे

Subscribe

सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक आहे.

हिंदु धर्मात तुळशीच्या रोपाला अधिक महत्त्व दिले जाते. तुळस ही अनेक आजारांवर अतिशय गुणकारी आहे, हे सर्वांच माहित आहे. परंतु तुळशीचे बी म्हणजेच सब्जा हा देखील शरिरासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते.

- Advertisement -

उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला उष्णतेचा दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक आहे.

सब्जाचे फायदे

  • प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
  • बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते.
  • गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.
  • प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
  • मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते.
  • सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -