घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात वेग मंदावून नाशिकसाठी लोकल चालवणे शक्य

कसारा घाटात वेग मंदावून नाशिकसाठी लोकल चालवणे शक्य

Subscribe

मध्य रेल्वे व ‘आरडीएसओ’च्या अधिकार्‍यांच्या सूचनेप्रमाणेच लोकल तयार होऊन कुर्ला कारशेडमध्ये येऊन सज्ज झालेली आहे. रेल्वे प्रशासनाने चाचणी घेण्यासाठी तांत्रिक मुद्दे पुढे केले आहेत. कसारा बोगद्यात लोकल रेल्वेगाडीचा वेग ताशी ६० वरुन २० किलोमीटर केल्यास व लोखंडी जाळीचे स्वयंचलित दरवाजे बसवल्यास चाचणी यशस्वी होईल. तसेच लोकल नाशिकपर्यंत सुरू होऊ शकेल, असा तोडगा सूचवणारे पत्र निवृत्त लोको निरीक्षक व प्रकल्प अभ्यासक वामन सांगळे यांनी रेल्वे मंत्रालयाला लिहिले आहे.

लोकल दाखल होऊन चार महिने होऊन गेले, तरी चाचणीला मुहूर्त लागत नाही. यामुळे कल्याण नाशिक लोकल प्रकल्पाचे अभ्यासक वामन सांगळे यांनी रेल्वे मंत्रायलयाला पत्र लिहून चाचणी घेण्याची विनंती केली आहे. त्यात मध्य रेल्वेची कल्याण-नाशिक लोकल अस्तित्वात येण्यासाठी सुरुवातीपासूनच अहवाल तयार करताना मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांना पत्रव्यवहार करून सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्याच सूचनांच्या आधारे करोडो रुपये खर्च करून लोकल सज्ज झालेली आहे. त्यात मुख्य इलेक्ट्रीकल अभियंता अनुप कुमार अग्रवाल यांनी इमू लोकल चालवण्यासाठी ताशी ६० किलोमीटर वेग निश्चित करत हरकत नसल्याचे पत्र २० ऑगस्ट २०१८ रोजी लखनौ येथील ‘आरडीएसओ’ कार्यालयास पाठवलेे आहे; परंतु यावेळी लोकलला मागील बाजूस बँकर इंजिन बसवणे आवश्यक असल्याची सूचनाही या पत्रातून केली आहे. यानंतर रेल भवनचे अधिकारी डॉ. महेंद्र कुमार यांना १७ मे २०१८ च्या पत्रान्वये ‘आरडीएसओ’चे संचालक विजय यांनी २२ नोव्हेंबर २०१८ रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून, या गाडीचे सिम्यूलेटर वर आम्ही परीक्षण केले आहे, यात ही लोकल कसारा घाटात सक्षम रित्या धावू शकेल. कसारा इगतपुरी घाट चढाचा असला तरी, बिना बँकर इंजिन न लावताही धावू शकते. तसेच लोकलला असणार्‍या चार मोटार कोचपैकी कोणताही एक मोटारकोच बंद पडला किंवा निकामी झाला, तरीही ही लोकल सक्षमपणे घाट चढून जाऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. याच पत्रात त्यांनी लोकलला पार्कींग ब्रेकची १६ ऐवजी ३२ चाकांना ब्रेक लावण्याची सुविधा वाढवण्यात यावी, ब्रेकची क्षमता १.२ किलोग्रॅम वरुन १.८ किलोग्रॅम दाबाची करण्याची सूचना दिली होती. लोकल ट्रेनला मेट्रो रेल्वेप्रमाणे सरकते दरवाजे लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त चुकून अपघात झालाच, तर प्रवाशांना लपण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची सुविधा पाहणी करण्यास सांगितले. बोगद्याच्या व्यासाचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सूचनांप्रमाणे लोकल तयार झालेली असताना चाचणी थांबवण्याचे कारण काय, असा सवाल सांगळे यांनी केला आहे.

- Advertisement -

बोगद्यातून लोकल ताशी ६० ऐवजी २० किलोमीटर या धिम्या गतीने चालवली, तरी ते चार बोगदे पार करण्यासाठी लागणारा ५ ते १५ सेकंदाचा वेळ वाढवून तो जास्तीत जास्त एक मिनिट लागणार आहे, असे सात बोगदे पार करून कसारा ते इगतपूरीचे १७ मिनिटाचे अंतर वाढवून २२ मिनिटापर्यंत जाऊ शकते. या आधारे चाचणी होण्यास हरकत नाही, असे पत्र रेल्वे मंत्रालयाला पाठवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -