घरक्रीडाकल्पेश कोळी स्मृती चषक स्पर्धा

कल्पेश कोळी स्मृती चषक स्पर्धा

Subscribe

अमन खानची (४ विकेट) अप्रतिम फिरकी गोलंदाजी आणि अभिनव सिंगच्या (८१ आणि ५०) चांगल्या फलंदाजीच्या जोरावर घाटकोपर विभाग अ संघाने एल.आय.सी कल्पेश कोळी स्मृती चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ठाणे विभाग ब संघाला पराभूत केले. त्यामुळे घाटकोपर विभाग अ संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून या फेरीत त्यांचा सामना कलिना विभाग ब संघाशी होणार आहे. कलिना विभाग ब संघाने उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात बलाढ्य कालिना विभाग अ संघाला १३९ धावांत गुंडाळले, तर याला उत्तर देताना ब संघाने जश गानिगा (६०) आणि अंक्रीश रघुवंशी (६०) यांच्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर ३४५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर कलिना विभाग ब संघाने अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीचा सामना २४ आणि २५ मे रोजी माटुंग्याच्या न्यू हिंद स्पोर्टींग क्लब येथे रंगणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण युट्युब आणि फेसबुकवर होणार आहे.

- Advertisement -

कलिना विभाग अ: सर्वबाद १३९ (राजसिंग देशमुख ३४; उमर खान ४/२०, झेनिथ सचदेव ४/४३) आणि ९ बाद १९९ (राजसिंग देशमुख ६४, क्रिश सुभ्रमण्यम ३९; अंक्रीश रघुवंशी २/६, आयुष्य जेथव २/१९, उमर खान २/४८) पराभूत वि. कलिना विभाग ब: सर्वबाद ३४५ (जश गानिगा ६०,अंक्रीश रघुवंशी, ६०, शाश्वत झुनझुनवाला ४४, तेजस चाळके ३/५८, शुभम खरात २/४४).
सामनावीर :उमर खान

घाटकोपर विभाग अ : सर्वबाद १८१ (अभिनव सिंग ८१; जय धात्रक ५/३७) आणि ९ बाद १६३ डाव घोषित (अभिनव सिंग ५०; आकाश सिंग ३/३९, आर्यन दलाल ३/६६) विजयी वि. ठाणे विभाग ब: सर्वबाद १६७ (आकाश सिंग ९८; अमन खान ४/४७, हर्ष मेंडोन २/२९, सिद्धांत वालावलकर २/३६).
सामनावीर : अभिनव सिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -