घरमहाराष्ट्र'राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात'

‘राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात’

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी असल्याचे संकेत आंबेडकरांनी दिले आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारण देखील सांगितले आहे. राज्यात औरंगाबाद वगळता इतर ठिकाणचे मुस्लिम मतदार आपल्या सोबत न आल्यामुळे पराभव झाला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आपल्या संपर्कात आहेत असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी संपर्कात असलेल्या १० आमदारांची नावं सांगितली नाही. ऐवढेच नाही, तर राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक लढवणार?

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर आणि अकोला या दोन मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली मात्र दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी असल्याचे संकेत आंबेडकरांनी दिले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची रणनिती, पक्ष कोणाशी युती-आघाडी करणार याबाबतची पक्षाची भूमिका ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेसोबत आघाडी नाहीच

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याबात अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसंच राजू शेट्टींनी पुढच्या काळात कोणासबत जावं हे त्यांनी लवकर स्पष्ट करावे असे देखील त्यांनी सांगितले. तसंच, राज ठाकरेंना विधासभा निवडणुकीमध्ये मोठी संधी असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र, मनसेसोबत आघाडीची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली – प्रकाश आंबेडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -