घरमुंबईकोकण रेल्वे रूळांवर धावणार ट्रेन १९

कोकण रेल्वे रूळांवर धावणार ट्रेन १९

Subscribe

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-मडगाव धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस जावून त्याएेवजी नव्या बांधणीची ट्रेन १९ कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-मडगाव धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस लवकरच यार्डात जाणार असून तिच्याएेवजी नव्या बांधणीची ट्रेन १९ कोकणवासीयांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसची निर्मिती थांबवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याएेवजी या मार्गावर ट्रेन १९ सुरू करण्याची रेल्वेने तयारी केली आहे. ट्रेन १९ ही वंदे भारत एक्सप्रेस आणि ट्रेन १८ ची पुढील आवृत्ती असणार आहे. देशात सध्या मुंबई-मडगाव आणि चेन्नई-मदुराई या मार्गांवरच तेजस एक्सप्रेस धावत आहे.

- Advertisement -

ट्रेन १९ ची वैशिष्ट्यं

डिस्ट्रीब्युटेड पॉवर रोलिंग स्टॉक या नव्या प्रकारची बांधणी ट्रेन १९ चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डीपीआरएस प्रणालीमुळे ट्रेन १९ ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर गाठू शकेल. या प्रणालीमुळे रेल्वेच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. या गाडीला स्लीपर कोचेचसही असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -