घरताज्या घडामोडीलक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडिया बँकेत विलिनीकरण

लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडिया बँकेत विलिनीकरण

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी लक्ष्मी विलास आणि डीबीएस इंडिया बँकेच्या विलिनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयाला आरबीआयकडून आधी परवानगी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून देखील मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय बँकेचे काही कर्ज रिस्ट्रक्चर करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लक्ष्मी विलास बँकेवरील निर्बंध आता उठवले जाणार आहेत.

यावर्षातील लक्ष्मी विलास बँक ही दुसरी बँक आहे ज्या बँकेला आरबीआयने बु़डण्यापासून वाचवले आहे. याआधी रिर्झव्ह बँकेने मार्चमध्ये येस बँकेला बुडण्यापासून वाचवले होते. गेल्या 15 महिन्यातील लक्ष्मी विलास ही तिसरी बँक आहे. डीबीएस इंडियामध्ये लक्ष्मी विलास बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर या करारानुसार डीबीएस इंडियाला लक्ष्मी विलास बँकेच्या 563 शाखा, 974 एटीएम आणि रिटेल बिझनेसमध्ये 1.6 अब्ज डॉलरची फ्रँचायझी मिळेल. यानंतर 94 वर्षे जुन्या आणि खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणार्‍या लक्ष्मी विलास बँकेचे नाव संपुष्टात येईल आणि बँकेची इक्विटी देखील संपेल. या बँकेचे संपूर्ण डिपॉझिट डीबीएस इंडियाकडे जाईल.

- Advertisement -

याआधी आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत आर्थिक निर्बंध लागू केला आहे. या दरम्यान खातेदार अधिकतर 25 हजारांची रक्कम काढू शकतात. नवीन नियमानुसार जर एकापेक्षा अनेक खाती असतील तर त्यामधून सर्व मिळून 25000 काढता येणार आहेत. ज्या लोकांचे वेतन खाते लक्ष्मी विलास बँकेत किंवा इतर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न या बँकेतील खात्यात येत होते त्यांना त्वरित थांबविण्यात आले आणि दुसर्‍या बँकेत हस्तांतरणाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यासाठी खातेदारांना एक पत्र लिहून त्यांचे वेतन किंवा अन्य उत्पन्न दुसर्‍या खात्यात वर्ग करण्याची विनंती करावी लागेल. लक्ष्मी विलास बँकेत तुमच्याकडे कर्ज खाते असल्यास ईएमआय रक्कम पहिल्या 25,000 रुपयांमधून वजा केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -