‘बिग बॉस 15’ फेम ‘Tejaswi Prakash’ला मिळाली मोठी ऑफर ; सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार

तेजस्विनी लवकरच अभिनेत्री एकता कपूरसोबत एका सीरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला 'नागिन' च्या सहाव्या सीजनसाठी विचारले आहे. तेजस्वीने बिग बॉस 15 मध्ये आपल्या दमदार खेळीने आणि याअगोदर छोट्या पडद्यावरील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Bigg Boss 15 fame 'Tejaswi Prakash' gets big offer; The audience will come to visit from the serial
'बिग बॉस 15' फेम 'Tejaswi Prakash'ला मिळाली मोठी ऑफर ; सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार

यंदाचे ‘बिग बॉस 15’ हे सीजन मोठ्या प्रमाणात गाजले आहे. यातील बिग बॉस 15’च्या सदस्या तेजस्वी प्रकाश पूर्ण सीजनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होती. तेजस्वीने घरातील प्रत्येक टास्क व्यवस्थितरित्या पार पाडला आहे. मात्र, आता हे सीजन संपण्याअगोदरच तेजस्वीला एक मोठी ऑफर मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, तेजस्विनी लवकरच अभिनेत्री एकता कपूरसोबत एका सीरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला ‘नागिन’ च्या सहाव्या सीजनसाठी विचारले आहे. तेजस्वीने ‘बिग बॉस 15’ मध्ये आपल्या दमदार खेळीने आणि याअगोदर छोट्या पडद्यावरील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

एका वृत्तानुसार, अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि अभिनेत्री महक चहल आधीपासूनच या ‘नागिन’ शोमध्ये आहेतच.आता त्यांच्यासोबत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काम करताना पाहायला मिळणार आहे. याअगोदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अनेक टिव्ही सिरीयलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिने ‘स्वरगिनी-जोडे रिश्तो के सुर’ या टिव्ही सिरीयलमधून छोट्या पडद्यावर काम केले होते. तेजस्वीने ‘पहरेदार पिया की’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ और पौराणिक शो ‘कर्णसंगिनी’ यासांरख्या शोमधून तेजस्वीला लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती खतरो का खिलाडीच्या 10 व्या सीजनचा हिस्सा होती. नागिन सिरीयल ही छोट्या पडद्यावरील एक हिट सिरीयल होती. सगळ्यात पहिले या शोमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने प्रसिद्धी मिळवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

 

अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार

सोशल मिडियावर जास्त सक्रिय असणारी नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सात फेरे घेणार आहेत.अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाच्या चर्चा सोशलमिडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. अखेर हा दोघांचा लग्नसोहळा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे. दोघांनी लग्नाचे ठीकाण ठरवले असून, हे एक बीच वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात कुटूंब आणि बिझनेसमधील काही लोक सहभागी होणार आहेत. दोघेही दुबईत नाही तर, गोवा येथे लग्नसोहळा करण्याचे प्लॅनिंग करत आहेत. या लग्नासंबंधित गुप्तता पाळण्याचे मौनी रॉयने सांगितले आहे.


हेही वाचा – Priyanka Chopra बनणार आई! Nick Jonas सोबत करतेय फॅमिली प्लॅनिंग