घरक्राइमनग्नावस्थेतील महिलेला बेड्या घालून अर्धा तास चौकशी पोलिसांना भोवली, महिलेला २२ कोटी...

नग्नावस्थेतील महिलेला बेड्या घालून अर्धा तास चौकशी पोलिसांना भोवली, महिलेला २२ कोटी नुकसान भरपाईचे आदेश

Subscribe

अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय महिलेशी पोलिसांनी गैरवर्तन केले. ज्याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी कोर्टाने निकाल देताना महिलेला २.९ मिलियन डॉलर (२२ कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. हे नेमके प्रकरण काय आहे वाचा….

अमेरिकेच्या शिकागोमध्ये ही घटना घडली आहे. २०१९ मध्ये एका आरोपीच्या शोधात असलेल्या काही पोलीस अधिकारी कृष्णवर्णीय महिला अंजनेट यंगच्या घरात घुसले होते. अंजनेट एक सामजिक कार्यकर्ती आहे. जेव्हा पोलिसांनी कारवाई केली तेव्हा अंजनेट यंग कपडे बदलत होती. पोलिसांनी त्याच वेळेस विना कपड्यात उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर तिला बेड्या घातल्या. मग बेड्या घालून जवळपास अर्धा तास तशी तिची चौकशी केली. महत्त्वाचे म्हणजे पोलीस ज्या आरोपीला शोध होते, ती अंजनेट नव्हती. तर तिच्या बाजूच्या घरातील एक व्यक्ती होता. या घटनेमुळे अंजनेट यंगला खूप धक्का बसला होता.

- Advertisement -

फेब्रुवारी २०२१मध्ये अंजनेट यंगने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये असा आरोप लावला की, पोलिसांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिला अपमानित केले. १२ पोलिसांविरोधात यंगने आरोप केला.

याप्रकरणी कोर्टाने म्हटले की, महिती दिल्यानंतर माहितीची पडताळणी करण्यात पोलिसांना अयपश आले आणि महिलेला नाहक अपमान, छळ सहन करावा लागला. पोलिसांच्या या गैरवर्तनासाठी कोर्टाने २.९ मिलियन डॉलर नुकसान भरपाई देण्यास सांगितली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नुकत्याच जन्मलेल्या लेकीचा सौदा करणाऱ्या माता-पित्यासह सहा जणांना ठोकल्या बड्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -