घरताज्या घडामोडीविजयस्तंभ आणि परिसर विकासकामांना गती देण्यासाठी भूसंपादन तातडीने करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

विजयस्तंभ आणि परिसर विकासकामांना गती देण्यासाठी भूसंपादन तातडीने करा, धनंजय मुंडेंचे निर्देश

Subscribe

शौर्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच शौर्यदिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणार आहे. येत्या १ जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

यावेळी विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक धरोहर असून लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण केले जावे यासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही या बैठकीत धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान हा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेचा ३० टक्के निधी तातडीने वितरीत करण्याच्या सूचना या बैठकीत धनंजय मुंडे यांनी दिल्या. त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग येणार आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा तसेच विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले.

- Advertisement -

यापुढे १ जानेवारी शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार असून, १ जानेवारी २०२२ च्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे, तसेच या अभिवादन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन केले जावे; अशा सूचना देखील धनंजय मुंडे यांनी पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. विजयस्तंभ येथे यापुढे होणाऱ्या सर्व अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देखील सामाजिक न्याय विभागाने घेतली आहे.

या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह, विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, सामाजिक न्यायविभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, गृहविभागाचे सहसचिव संजय खेडकर, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखरे आदी उपस्थित होते.


हेही वाचा : Omicron Variant : ओमिक्रॉन डेल्टापेक्षा दोन पट घातक, भारतात रूग्ण वाढण्याची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -