घरताज्या घडामोडीकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही

काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही

Subscribe

महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असून तिन्ही पक्षांमधील ताळमेळ नसल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. सोमवारी हा प्रकार पुन्हा समोर आला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

‘काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही. याच कारणामुळे नांदेडलाही निधी मिळालेला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला’, असे वक्तव्य अशोक चव्हाणांनी केले आहे. अशोक चव्हाण हे परभणीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा चव्हाणांनी घेतला. ‘आपण सत्तेत असतो तेव्हा आपल्या भागाचा विकास व्हायला हवा या मताचा मी आहे. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे ३० टक्केच निधी मिळाला. याही परिस्थितीत मराठवाड्यात जास्तीत जास्त निधी देण्याची माझी भूमिका आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. मात्र, राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकास आघाडी प्रत्यक्षात आली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी कशी झाली, या प्रश्नावरील उत्तरात अशोक चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -