घरताज्या घडामोडीअंबरनाथमधील शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभिकरणावरून वाद

अंबरनाथमधील शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभिकरणावरून वाद

Subscribe

अंबरनाथमधील शिवाजी महाराज चौकाच्या सुशिभिकरणावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी या कार्यक्रमाबाबत आक्षेप घेतल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अंबरनाथमधील शिवाजी महाराज चौकाच्या सुशिभिकरणावरून वाद निर्माण झाला आहे. अंबरनाथ येथील शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी व सुशोभीकरणासाठी स्थायी समितीने निधी मंजूर केला आहे. तरीदेखील हा निधी न वापरता एका बिल्डरद्वारा हा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या कामासाठी नगरपालिका सक्षम आहे मात्र बिल्डरला कामाचे श्रेय देण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला आहे.

अंबरनाथ ( पूर्व ) येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा आहे. हा पुतळा फार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला आहे. दरम्यान पुतळ्याच्या भोवताली असलेल्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर रस्ते उंच झाले आणि पुतळ्याची उंची कमी झाली होती. यानंतर नगरपालिका प्रशासनाने पुतळ्याचे सुशोभीकरण, उंची वाढविणे, पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दिनांक ४.९.२०१९ रोजी स्थायी समितीमध्ये विषय क्रमांक १६ अन्वये ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी सुशोभीकरणासाठी वापरला गेला नाही तर बिल्डर बेचर पटेल यांनी सुशोभीकरणाचा खर्च केलेला आहे. ही बाब उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी उघडकीस आणली आहे .

- Advertisement -

कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात

यानंतर सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून उद्या १५ फेब्रुवारी २०२० रोजी या कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत बेचर पटेल ( प्रॉपरायटर रॅपिड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लि ) हे नाव स्पष्टपणे देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर ,नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी या कार्यक्रमाबाबत आक्षेप घेतल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

- Advertisement -

शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या कामाला स्वतःहून जर एखाद्या कंपनीने पुढाकार घेतला व चांगले काम केले तर त्याला हरकत घेण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. तसेच शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही , त्यांच्या नावाने राजकारण होऊ नये असे अंबरनाथ शहराचे शिवसेनाप्रमुख अरविंद वाळेकर म्हणाले. तर शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी नगरपालिकेने निधी मंजूर केलेला आहे. असे असतानादेखील एका बिल्डरला श्रेय देण्यासाठी हा अट्टाहास करणे चुकीचे आहे. असे मत अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -