घरCORONA UPDATECorona Live Update: रायगडमध्ये मृतांची संख्या ६६१ वर

Corona Live Update: रायगडमध्ये मृतांची संख्या ६६१ वर

Subscribe

रायगडमध्ये मृतांची संख्या ६६१ वर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात तब्बल १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या २१ हजार ९३० वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या ६६१ वर पोहोचली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

औरंगाबादमध्ये १४ हजार २१७ जणांनी केली कोरोनावर मात

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६०१ झाली आहे. तर आज सकाळी आणखी ४८ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ०४७ झाली आहे. त्यापैकी १४ हजार २१७ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ४ हजार २३१ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण

मुंबईत गेल्या २४ तासांत ९३१ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ४१० इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार १९३ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १७ हजार ६९७ इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार २१९ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात आज कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

राज्यात आज दिवसभरात ११ हजार ११९ नवे कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून आज तब्बल ४४२ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार आज कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आज ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचला आहे. तर २० हजार ६८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती दिली आहे.


भारतात आज कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार असल्याची माहिती निती आयोगाने दिली आहे.

देशात २४ तासात ८ लाखाहून अधिक चाचण्या


आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमधील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या ‘धारावी पॅटर्न’चे कौतुक WHO ने केले होते. आता मुंबई महापालिकेचा ‘धारावी पॅटर्न’ फिलिपिन्स राबवणार आहे. फिलिपिन्समधील झोपडपट्ट्यांमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी तिथले सरकार ‘धारावी पॅटर्न’चा वापर करणार आहेत. सविस्तर वाचा


देशात गेल्या २४ तासांत ५५ हजार ८९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख २ हजार ७४३वर पोहोचली आहे. यापैकी ५१ हजार ७९७ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ लाख ७७ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ७३ हजार १६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


देशात १७ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ९ लाख ४१ हजार २६४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी सोमवार दिवसभरात ८ लाख ९९ हजार ८६४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुधाकरपंत परिचारक हे एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. सविस्तर वाचा


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात २ कोटी २० लाख ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ७ लाख ७७ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी ४७ लाख ८३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात सोमवारी दिवसभरात ८ हजार ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ०४ हजार ३५८ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार २६८ Active रुग्ण आहेत. तसेच सोमवारी राज्यात २२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -