घरCORONA UPDATECorona Live Update: अंबरनाथमध्ये कोरोनाचे ४१ नवे रुग्ण

Corona Live Update: अंबरनाथमध्ये कोरोनाचे ४१ नवे रुग्ण

Subscribe

अंबरनाथमध्ये कोरोनाचे ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व भागात २९ तर पश्चिम भागात १२ रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत अंबरनाथमध्ये कोरोनाचे २८७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर २३४४ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ४१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


वसई तालुक्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे नवे 229 रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील महापालिका हद्दीतील 213 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर वसईच्या ग्रामीण भागात नवे सोळा रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

वसईत 87, नालासोपार्‍यात 59, विरारमध्ये 65 आणि नायगावमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर नालासोपार्‍यात दोन आणि वसईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 8 हजार 760 इतकी झाली असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. वसईच्या ग्रामीण भागात नवे 16 रुग्ण आढळले आहेत. अर्नाळ्यात नऊ, टिवरीत दोन, तरखडमध्ये तीन, चंद्रपाड्यात एक आणि वडघरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 411 झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत आज कोरोनाचे १,४९८ नवे रुग्ण, तर ५६ जणांचा मृत्यू

- Advertisement -

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजार ७५१ वर पोहचली आहे. तर ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५२० वर पोहचला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात २४ तासांत ८,६४१ नव्या रूग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ६४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २६६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ५८ हजार १४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यातच जर ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी खासगी लॅब मध्ये अडीच ते तीन हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहेत. अनेक भागातील नागरिक कोरोना संदर्भातील चाचण्या महाग असल्यामुळे त्या करत नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची हीच आर्थिक समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाने भिनार येथे सुरु केलेल्या कोविड सेंटर मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना संदर्भातील चाचणी मोफत करावी तालुक्यातील शेतकरी व कष्टकरी नागरिकांना त्याचा फायदा होईल अशी मागणी भिवंडीचे युवासेना उपतालुका प्रमुख कल्पेश केणे यांनी भिवंडी पंचायत समितीचे शिवसेना सभापती विकास भोईर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


अकोला जिल्ह्यात कोरोनाचे १२ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार ९५५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.


भारताचा माजी कर्मधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. कारण सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिन स्नेहाशीष यांना कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर वाचा 


जालना जिल्ह्यात ८० कोरोनाबाधित नव्या  रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १८२ वर पोहोचला आहे. तर आपार्यंत ७१५ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तसेच कोरोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीतून ६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ५१०वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


देशात २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून ६०६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा 


१५ जुलैपर्यंत देशात १ कोटी २७ लाख ३९ हजार ४९० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे काल ३ लाख २६ हजार ८२६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.


संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. जगातील वाढत्या कोरोनाबाधित आकड्यांप्रमाणाचे कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा देखील वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १ कोटी ३६ लाखांहून अधिक जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी आतापर्यंत ५ लाख ८६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ८० लाख ३७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात बुधवार ७ हजार ९७५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात २३३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७५ हजार ६४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -