कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

coronavirus
कोरोना

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आज सकाळ पासून पुरवठा कार्यलय बंद करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश भागात नागरिकांना प्रवेशासाठी मनाई करण्यात आली आहे. तर कार्यालयाचा वरचा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

या कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून त्यांची देखील चाचणी केली जाणार आहे. तसेच सध्या नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करा, अशी मागणी भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य आणि माजी खासदार धनंजय महाडिक जिल्ह्याला प्रशासनाकडे केली आहे. ते म्हणाले की, ‘मानवाचा जीव सर्वात अनमोल आहे. परिस्थिती बिघडण्याची आता आणखी वाट न पाहता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जारी करावा.’

‘कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५०० च्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात किमान १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करावा’, अशी भूमिका धनजंय महाडिक यांनी मांडली आहे.


हेही वाचा – Corona: आज औरंगाबादमध्ये ६६ नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत ३७० जण मृत्यूमुखी!