घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत २४ तासांत १,३६५ नवे रुग्ण

Corona Live Update: मुंबईत २४ तासांत १,३६५ नवे रुग्ण

Subscribe
मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३६५ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० हजार ९९० वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या ४ हजार ६० झाली आहे. तसेच आज २ हजार १४१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३९ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज तब्बल २३६ तर पनवेल मनपा क्षेत्रात ८२ नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजार ६२९ वर गेला आहे. तर पनवेल मधील रुग्णांची संख्या १ हजार ६१२ वर गेली आहे. तर नवी मुंबईत आतापर्यंत ३ हजार १८८ रुग्ण बरे झाले असून २ हजार २५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा १८९ आहे. पनवेलमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ९० आहेत. तर ४५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी अत्यंत अल्प वेतनात काम करीत आहेत. महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार किमान वेतनसाठी पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. covid-19 सारख्या भयंकर साथ रोगातही अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे या अभियानातील कर्मचारी देखील जोखीम पत्करून सेवा देत आहेत. मात्र, अल्प वेतनामुळे या अभियानातील कर्मचार्‍यांना  कुटुंबाचा उदरनिर्वाहसाठी धडपड करावी लागत आहे. आंदोलनचा पवित्रा घेऊनही अभियानातील कर्मचार्‍यांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आल्याचा आरोप हे कर्मचारी करीत आहेत. अभियानात अनेक कर्मचारी असून त्यांना गेल्या पाच वर्षांत कोणती वेतनवाढ मिळालेली नाही. तर अभियानातील कर्मचारी covid-19 सारख्या भयंकर साथरोगातसुद्धा रुग्णसेवा निष्ठेने देत आले आहेत.

- Advertisement -

राज्यात आज ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ७७ हजार ४५३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

अकोला जिल्ह्यात ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ३४०वर पोहोचली असून आतापर्यंत ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


गेल्या २४ तासांत ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात एकूण ५४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३ हजार २३९ पोलीस कर्मचारी बरे झाले असून ९९१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


कोरोनामुळे मालाड येथील ३९ वर्षीय डबेवाल्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामुळे डबेवाल्यांना धक्का बसला आहे. या डबेवाल्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा आहे.


पुण्यात एका रात्रीत १६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार ६८३वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत ६३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


औरंगाबादमध्ये काल दिवसभरात सर्वाधिक २३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार १६६वर पोहोचला आहे. काल आढळलेल्या रुग्णांपैकी ७७ महिला, १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. काल मनपा क्षेत्रात १२४ तर ग्रामीण भागात १०६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सविस्तर वाचा 


देशात २४ तासांत २ लाख ७ हजार ८७१ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे २४ तारखेपर्यंत ७५ लाख ६० हजार ७८२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे.


देशात मागील २४ तासांत १६ हजार ९२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ७३ हजार १०५ वर पोहोचला असून मृतांचा १४ हजार ८९४ झाला आहे. सध्या १ लाख ८६ हजार ५१४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ७१ हजार ६९७ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत दिल्लीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ३९०वर पोहोचली आहे. तर मुंबईची कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ५२८वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत दिल्लीत २ हजार ३६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत ३ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला आहे.


जगभरातील कोरोनाचा कहर कायम आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९५ लाखांहून अधिक आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ९५ लाख २७ हजार ९९वर कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला असून यापैकील ४ लाख ८४ हजार ९५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५१ लाख ७५ हजार २४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


काल राज्यातील ४ हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७३ हजार ७९२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल ३ हजार ८९० नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत २०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात काल ६२ हजार ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -