घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात ३७५२ कोरोना रुग्णांची नोंद

Corona Live Update: राज्यात ३७५२ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

रुग्णसंख्येत नाशिक मालेगावच्या पुढे

रुग्णसंख्येत मालेगाव नाशिकच्या अनेक पटीने पुढे असताना गेल्या काही दिवसांपासून मात्र नाशिक शहरातील रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. परिणामी गुरुवारी (दि. १८) नाशिकने मालेगावला मागे टाकल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात १४८ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण २१, नाशिक शहर ११६ मालेगाव ११ आणि जिल्ह्याबाहेरील २ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पाच बाधितांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर २, मालेगाव २ आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४22 करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात ९७७ रूग्ण आहेत.

- Advertisement -

पिंपरी – चिंचवडमध्ये १०८ नवे कोरोना रुग्ण

पिंपरी – चिंचवड शहरात सर्वाधिक १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर दापोडी येथील ६५ वर्षीय, दिघी येथील ४३ वर्षीय आणि शिरपूर धुळे येथील ६६ वर्षीय पुरुषांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत पुण्यात ४७२ नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक वाढ झाली असून आज ४७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पुण्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मिशन बिगीन अगेनच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला आहे. यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी आज दिवसभरात राज्यात १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ च्या घरात पोहोचला आहे.


मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या तीन दिवसांपासून येत असलेल्या मृतांच्या आकड्यांमध्ये मात्र फरक असल्याचे आज दिसून आले. रोज ७० च्या पुढे असणारे कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा आज ६७ आहे. गेल्या २४ तासांत १ हजार २९८ नवे रुग्ण मुंबईत आढळून आले असून ५१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने आजची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत ६२ हजार ७९९ इतकी कोरोनाबाधितांची संख्या मुंबईमध्ये झाल्याचे समजते.


भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २५ नवे रुग्ण आढळले असून शहर आणि ग्रामीण भागात एकूण ६५ नवे रुग्ण आज आढळले आहेत. वाढत्या नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी गुरुवार पासून मनपाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊन बरोबरच रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने शहरात रुग्णांच्या मृत्यू संख्येय वाढ होत असल्याचा आरोप मनपा प्रशासनावर करण्यात येत आहे.


यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात नऊ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण रूग्णसंख्या २०७ झाली आहे. विलगीकरणत कक्षात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. तर आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पुसद शहरातील चार, दारव्हा शहरातील चार आणि एक जण नेर येथील आहे. यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.


कोरोनाच्या लढ्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने ५० लाखांचे सानुग्रह अनुदान आणि राज्य पोलीस दलातर्फे १० लाखांचा विमा असे एकूण ६० लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शहीद पोलिसांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.


आज आसाममध्ये ८२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत आसाममधील कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ७७७ झाला आहे. तसेच २ हजार १११ रुग्ण सध्या उपचार सुरू आहेत.


ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिरातील यावर्षी कोणतीही रथ यात्रा होणार नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही यात्रा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.


औरंगाबादमध्ये कोरोनाच्या ७० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १०६वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सविस्तर वाचा 


जालनामध्ये राज्य राखील दलातील ८ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईहून जालनात हे जवान परतले होते. त्यामुळे जालना जिल्हातील कोरोना रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जालन्यात १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १२ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६६ हजार ९४६वर पोहोचला असून मृतांचा आकडा १२ हजार २३७ झाला आहे. तसेच आता १ लाख ६० हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ९४ हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


वंदे भारत मिशन अंतर्गत न्यूझीलंडच्या ऑकलँडहून ११६ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे एआय़ १३१७ विमान काल चंदीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी खूणा करण्यासत आला. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्या आहेत.


जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, जगातील ८३ लाख ९८ हजार ६७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ४ लाख ५१ हजार २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४२ लाख ८ हजार ८४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात बुधवारी ३३०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,१६,७५२ झाली. यामध्ये ५१,९२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५६५१ झाली आहे. आज १३१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत ५९,१६६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.६८ % एवढे आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -